Goa Cabinet: चतुर्थीपूर्वी मंत्रिमंडळात होऊ शकतो बदल; दामू नाईकांचा संकेत; मुख्‍यमंत्र्यांकडून ‘सस्‍पेन्‍स’ कायम

Goa Politics: मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांनी दिल्ली दौरा करून वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली, तरीही मुख्‍यमंत्र्यांनी याबाबत ‘सस्‍पेन्‍स’ कायम ठेवला आहे.
Damu Naik, CM Pramod Sawant
Damu Naik, CM Pramod Sawant Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांनी दिल्ली दौरा करून वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली, तरीही मुख्‍यमंत्र्यांनी याबाबत ‘सस्‍पेन्‍स’ कायम ठेवला आहे. फेरबदल चतुर्थीपूर्वी होऊ शकतो, असे संकेत नाईक यांनी दिले.

मुख्‍यमंत्री डॉ. सावंत यांनी दिल्ली दौरा करून भाजपाध्‍यक्ष तथा केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. त्‍यानंतर अमित शहा यांचीही भेट घेऊन त्‍यांच्‍याशी विविध विषयांवर चर्चा केली. त्‍याआधी दामू नाईक यांनी दिल्लीत जाऊन भाजपचे राष्‍ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांची भेट घेतली होती.

त्‍यामुळे पुढील काहीच दिवसांत फेरबदल होण्‍याच्‍या चर्चा सुरू झाल्‍या आहेत. परंतु, मुख्‍यमंत्र्यांनी यावर थेट भाष्‍य करणे टाळले आहे. तर, मंत्रिमंडळ फेरबदलाचे पूर्ण अधिकार मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना आहेत. त्‍यामुळे याबाबत तेच निर्णय घेऊ शकतात. पण, गणेश चतुर्थीपूर्वी फेरबदल होऊ शकतो, असे दामू नाईक यांनी गोमन्तकशी बोलताना सांगितले.

२०२२ च्‍या विधानसभा निवडणुकीनंतर काहीच महिन्‍यांत काँग्रेसचे आठ आमदार फुटून भाजपात आले. तेव्‍हापासून राज्‍य मंत्रिमंडळातील फेरबदलाच्‍या चर्चा वारंवार झडत होत्‍या. लोकसभा निवडणुकीआधी दक्षिण गोव्‍यातील राजकीय समीकरणांचा विचार करून भाजपने नीलेश काब्राल यांना मंत्रिमंडळातून वगळून त्‍यांच्‍याजागी आलेक्‍स सिक्‍वेरा यांची वर्णी लावली.

Damu Naik, CM Pramod Sawant
Goa Politics: खरी कुजबुज; मुंगूल गँगवॉरचा ‘खरा सूत्रधार’ कोण?

त्‍यानंतर लोकसभा निवडणुकीचा निकाल येताच आणखी तीन मंत्र्यांना वगळून त्‍यांच्‍याजागी तीन आमदारांना मंत्री म्‍हणून संधी देण्‍याचे संकेत मुख्‍यमंत्री आणि दामू नाईक यांनी दिले होते. परंतु, आतापर्यंत मंत्रिमंडळात फेरबदल झालेला नाही. विधानसभा अधिवेशनाच्‍या काही दिवस आधी गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळल्‍यानंतर अधिवेशनाआधी मंत्रिमंडळात फेरबदल होण्‍याची शक्‍यता राजकीय वर्तुळातून व्‍यक्त केली जात होती. मुख्‍यमंत्री डॉ. सावंत यांनी ही शक्‍यता फोल ठरवली.

Damu Naik, CM Pramod Sawant
Goa Politics: गोवा वाचवण्यास समविचारी पक्षांनी एकत्रित येणे गरजेचे! कॅ. विरियातो यांचे प्रतिपादन; बोगस मतदारांवरून मांडली भूमिका

इच्‍छुकांतून नाराजी

मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांना वगळून त्‍यांच्‍याजागी सभापती रमेश तवडकर, ज्‍येष्‍ठ आमदार दिगंबर कामत, संकल्‍प आमोणकर आणि मायकल लोबो किंवा डिलायला लोबो यांच्‍यापैकी एक यातील तिघांना मंत्रिपदाची संधी देण्‍याचा विचार पक्षाने चालवला आहे.

विधानसभा निवडणूक अवघ्‍या दीड वर्षांवर आल्‍यामुळे लवकरात लवकर फेरबदल होऊन संधी मिळाल्‍यास मंत्री म्‍हणून काम करण्‍यासाठी अधिक वेळ मिळेल, असे इच्‍छूक आमदारांना वाटत आहे. पण, गेले अनेक महिने पक्षाकडून याबाबत ठोस निर्णय घेण्‍यात येत नसल्‍यामुळे त्‍यांच्‍यातून निराशा व्‍यक्त करण्‍यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com