Goa Cabinet: मंत्रिमंडळ बदल लांबणीवर; गृहमंत्र्यांकडून नो सिग्नल

Goa Politics: गोवा मंत्रिमंडळाची पुनर्रचना करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर पक्षाचा वाढता दबाव आहे
Goa Politics: गोवा मंत्रिमंडळाची पुनर्रचना करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर पक्षाचा वाढता दबाव आहे
Michael Lobo, Digambar kamat, Sankalp AmonkarDainik Gomantak
Published on
Updated on

पक्षश्रेष्ठींची भेट मिळत नसल्यामुळे विशेषत: गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून हिरवा कंदिल दाखविला गेला नसल्यामुळे गोवा मंत्रिमंडळातील संभाव्य बदल लांबणीवर पडला आहे. मुख्यमंत्री सावंत हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांना दिल्लीत जरूर भेटून आले; परंतु त्यांना गृहमंत्री अमित शहा यांची अद्याप भेट होऊ शकलेली नाही. संसद भवनात ते मुख्यमंत्र्यांना अवघीच काही मिनिटे भेटले; परंतु ती सदिच्छा भेट होती, अशी माहिती पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने आज ‘गोमन्तक’ला दिली.

मुख्यमंत्र्यांवर दबाव, पण मुहूर्त सापडेना!

गोवा मंत्रिमंडळाची पुनर्रचना करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर पक्षाचा वाढता दबाव आहे. काही वादग्रस्त व अकार्यक्षम मंत्र्यांना बदलून कॉंग्रेसमधून पक्षात आलेल्यांची वर्णी मंत्रिपदी लावावी, असे ठरले आहे; परंतु त्यासाठी योग्य मुहूर्त सापडत नाही, अशी मुख्यमंत्र्यांची गोची झाली आहे.

धोक्याच्या छायेतील मंत्र्यांचेही जोरदार लॉबिंग

‘‘भाजपसमोरील राजकीय पेचप्रसंगांमध्ये नव्या बदलांसाठी २०२४ मध्ये केंद्रीय नेत्यांना वेळ मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे’’, असे मत पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केले. या बदलात दिगंबर कामत, मायकल लोबो आणि संकल्प आमोणकर यांच्यापैकी काहींना सामावून घेण्याची शक्यता होती; परंतु ज्यांच्यावर कुऱ्हाड कोसळू शकते, अशा काही मंत्र्यांनीही जोरदार लॉबिंग चालविले आहे, अशी माहिती प्राप्त झाली.

Goa Politics: गोवा मंत्रिमंडळाची पुनर्रचना करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर पक्षाचा वाढता दबाव आहे
Goa Cabinet Expansion: गोवा मंत्रिमंडळात तीन नवे चेहरे? मुख्यमंत्र्यांकडून संकेत

कामतांच्या मंत्रिपदाबाबत ‘चुप्पी’

दिगंबर कामत यांना मंत्रिपद मिळेल काय, यासंदर्भात मात्र पक्षात नीरव शांतता आहे. लोकसभा निवडणुकीत ते आपली चमक दाखवू शकलेले नाहीत. त्यांना पाच हजारांचेही मताधिक्य आणता आले नाही, शिवाय दक्षिण गोव्यातील अत्यंत प्रभावी नेता असल्याचा समजही आता लोप पावू लागला आहे.

भाजपवासी झालेल्यांची दुहेरी कोंडी

दुसऱ्या बाजूला आपल्याला भाजपमध्ये प्रवेश देऊन वाटाण्याच्या अक्षता लावल्या, असा समज कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या सदस्यांमध्ये आहे. केंद्रीय नेत्यांनी आपल्याला बोलावून घेतल्यानेच आम्ही भाजपमध्ये गेलो, अशा बढाया हे नेते मारत होते. आता त्यांच्या कार्यकर्त्यांच्या नजरेतूनही ते चेष्टेचा विषय बनले आहेत.

Goa Politics: गोवा मंत्रिमंडळाची पुनर्रचना करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर पक्षाचा वाढता दबाव आहे
Goa Cabinet Meet: मंत्र्यांना परस्पर दिल्लीवाऱ्या भोवल्या! बैठकीत काय घडले?

...या कारणांमुळे गृहमंत्र्यांची भेट मुश्‍कील

विधानसभा अधिवेशन ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालेल. त्यानंतर ऑगस्टमध्येही मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांची भेट मिळेल, असे वाटत नाही.

कारण गृहमंत्री सध्या जम्मूमधील गंभीर परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.

त्या शांततापूर्ण भागात अराजक निर्माण झाले असून सरकारसमोर ते एक मोठेच आव्हान आहे.

शिवाय पुढच्या तीन वर्षांत विधानसभा निवडणूक होणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये पक्षात मतभेद निर्माण झाले आहेत.

ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या महाराष्ट्र व हरियाणा या राज्यांमधील निवडणुकीची व्यूहरचनाही सुरू झाली आहे.

महाराष्ट्रात भाजपची अपमानास्पद हार होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com