Cabinet Meeting: विधानसभेत सरकार मांडणार 13 विधेयके; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय, मुख्यमंत्री प्रमोद सावंतांची माहिती

Pramod Sawant Cabinet Meeting: मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री सावंत यांनी पत्रकारांना सांगितले, की १३ विधेयकांचे अध्यादेश काढले आहेत, त्यावर आजच्या बैठकीत अल्पशी चर्चा झाली.
Pramod Sawant Cabinet Meeting
Cabinet MeetingDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: जे अध्यादेश काढले आहेत, अशी १३ विधेयके विधानसभा अधिवेशनात सरकारतर्फे मांडण्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री सावंत यांनी पत्रकारांना सांगितले, की १३ विधेयकांचे अध्यादेश काढले आहेत, त्यावर बैठकीत अल्पशी चर्चा झाली.

Pramod Sawant Cabinet Meeting
Goa BJP: भाजपचे निवडणूक रणशिंग, मुख्यमंत्र्यांनी तपासले मंत्र्यांचे साडेचार वर्षांतील विकासकामांचे प्रगतिपुस्तक

ही विधेयके अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडली जातील आणि चर्चेनंतर तिसऱ्या दिवशी मंजूर केली जातील. या सत्रासाठी ८८३ प्रश्न (१६३ तारांकित आणि ७२० अतारांकित) आमदारांकडून आले आहेत.

सरकारसाठी अधिवेशन औपचारिकता : युरी

तीन दिवसांच्या अधिवेशनावर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी टीका केली असून, सरकार सभागृहाच्या कामकाजाकडे केवळ ‘औपचारिकता’ म्हणून पाहत असल्याचा आरोप केला.

Pramod Sawant Cabinet Meeting
Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

निवडणुकांपूर्वीचे हे शेवटचे अधिवेशन असू शकते, असे नमूद करत अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची विनंती करणारे पत्र विधानसभा अध्यक्षांना लिहिणार असल्याचे युरी यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com