

पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी नवी दिल्ली येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची सदिच्छा भेट घेतली. गोव्यातील ‘डबल इंजिन’ सरकारकडून राबविण्यात येणारी विकासकामे, कल्याणकारी योजना आणि पक्ष संघटना बळकटीकरणावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. मात्र, राज्य मंत्रिमंडळातील एक पद रिक्त असताना झालेल्या या भेटीमुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांनाही पुन्हा उधाण आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित आणि स्वयंपूर्ण गोवा घडविण्याच्या दिशेने सरकार कटिबद्ध असल्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.
मात्र, या अधिकृत माहितीसोबतच मुख्यमंत्री आणि भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वातील या भेटीमुळे राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांनाही पुन्हा उधाण आले आहे. राज्य मंत्रिमंडळात सध्या एक मंत्रिपद रिक्त असून, विधानसभा निवडणुकीस अवघे सहा महिने शिल्लक राहिल्याने हे पद कधी भरले जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
रिक्त मंत्रिपदाबाबत...
१) भाजपच्या सत्ताधारी वर्तुळात या भेटीदरम्यान मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय चर्चिला गेला असावा, अशी चर्चा रंगू लागली आहे. मात्र, याबाबत अधिकृतरीत्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तरीही रिक्त मंत्रिपद भरून निवडणुकीपूर्वी राजकीय आणि सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न पक्षाकडून होऊ शकतो.
२) रिक्त मंत्रिपदासाठी पक्षातील काही विद्यमान आमदारांची नावे चर्चेत आहेत. त्याचबरोबर दिवंगत कृषीमंत्री रवी नाईक यांचे ज्येष्ठ पुत्र रितेश नाईक यांनाही विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाकडून मोठी जबाबदारी देण्यात येऊ शकते, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.