Goa Revenue Growth: गोव्याच्या तिजोरीत 11 हजार कोटींची भर! सात वर्षांच्या आर्थिक प्रगतीचा CM सावंतांकडून आढावा

Goa Seventh Budget 30000 Crore: मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर मांडलेला पहिला अर्थसंकल्प १९ हजार कोटी रुपयांचा होता.
Goa Seventh Budget 30000 Crore
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर मांडलेला पहिला अर्थसंकल्प १९ हजार कोटी रुपयांचा होता. आता सातवा अर्थसंकल्प ३० हजार कोटींचा आहे. गेल्या सात वर्षांत विविध माध्यमांतून राज्याच्या महसुलात ११ हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

त्यामुळे जनहिताच्या योजनांसाठी अनुदान देताना सरकारने कधीही काटकसर केली नाही; सर्व योजनांचे अनुदान मुक्तहस्ते देण्यात आले, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

Goa Seventh Budget 30000 Crore
Goa Liquor Smuggling: नाकाबंदीला हुलकावणी, गोव्याची दारु तेलंगणात! ट्रकमधून 400 बाटल्या जप्त; अबकारी नाके कुचकामी

गोवा छायापत्रकार संघटनेचा १९वा वर्धापनदिन आणि जागतिक छायापत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्‍यमंत्री बोलत होते. यावेळी कला व संस्कृती संचालक विवेक नाईक, माहिती व प्रसिद्धी खात्याचे संचालक अभीर हेदे, संघटनेचे अध्यक्ष संदीप देसाई, आतिश नाईक उपस्थित होते.

शब्दांपेक्षा छायाचित्र अधिक प्रभावी

एखाद्या बातमीपेक्षा प्रभावी छायाचित्र अधिक परिणामकारक ठरते. शब्दांशिवाय छायाचित्रातून व्यक्त होणारे भाव अधिक प्रभावी असतात, असे मुख्यमंत्री म्‍हणाले. छायाचित्रकार संघटनेला आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

Goa Seventh Budget 30000 Crore
Goa Stray Dog: भटक्या कुत्र्यांसाठी कुडका येथे निवारा! पणजी महापालिकेला न्यायालयाचा मोठा आदेश

यावेळी ज्येष्ठ छायाचित्रकार नंदेश कांबळी आणि अनिल बी. नाईक यांचा सन्मान करण्यात आला. संघटनेतर्फे आयोजित विद्यार्थी व खुल्या गटातील छायाचित्र स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकेही देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com