Goa Chicken Prices: 'पार्टी अभी बाकी है'... पण बजेटचं काय? मासळीपाठोपाठ आता चिकनच्या दरातही मोठी वाढ, खवय्यांच्या जिभेला लगाम

Goa Broiler Chicken Price Hike: ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त ब्रॉयलर चिकन महाग झाले असून, पुढील दोन ते तीन दिवसांत ते आणखी महागणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
Goa Broiler Chicken Price Hike
Goa Broiler Chicken Price HikeDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: एकाबाजूने मासळी महाग झाली असतानाच, आता ब्रॉयलर चिकनच्या दरातही वाढ झाली आहे. ब्रॉयलर चिकन महाग झाल्याने खवय्यांच्या खिशाला कात्री बसत असून, जीभेवरही लगाम घालावा लागत आहे.

ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त ब्रॉयलर चिकन (Chicken) महाग झाले असून, पुढील दोन ते तीन दिवसांत ते आणखी महागणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून डिचोलीत ब्रॉयलर कोंबड्यांची आवक होत असते. कोंबड्यांचे खाद्य महाग झाल्याने त्यातच वाहतूक खर्चही वाढल्याचे कारण पुढे करून गेल्या काही महिन्यांपासून ब्रॉयलर कोंबड्यांचे दर वाढत आहेत. आता तर गेल्या महिन्याच्या तुलनेत ब्रॉयलर कोंबड्यांच्या दरात किलोमागे ३० रुपयांनी वाढ झाली आहे. दुसऱ्या बाजूने ब्रॉयलर अंडीही महाग झाली आहेत.

Goa Broiler Chicken Price Hike
Goa Chicken Shortage: गोव्यातील 'बॉयलर चिकन'चा पुरवठा सुरळीत होणार?

महिन्यापूर्वी ब्रॉयलर कोंबडीचे दर १६० ते १७० रुपये किलो असे होते. मात्र, आता हाच दर २०० रुपयांवर पोचला आहे. नेट (सुटे) ब्रॉयलर चिकन तर २५० रुपयांवरून ३२० रुपयांवर पोहोचले आहे. चिकन महाग झाल्याने गेल्या दोन-तीन दिवसांत चिकन विक्रीत २५ ते ३० टक्के घट झाली आहे. ब्रॉयलर कोंबड्यांचा तुटवडा नसला, तरी ख्रिसमसनिमित्त चिकनचे दर वाढले आहेत. नववर्षाला ब्रॉयलर चिकनला मागणी वाढणार असल्यामुळे नववर्षाच्या पूर्वदिनापर्यंत चिकन आणखी महागण्याची शक्यता आहे, तसा अंदाजही विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे.

Goa Broiler Chicken Price Hike
Chicken Cancer Risk: चिकन खाल्ल्याने वाढतो कॅन्सरचा धोका? संशोधनातून खुलासा; नॉनव्हेज लव्हर्सची वाढली चिंता

अंडी १०० रुपये डझन

चिकनप्रमाणेच ब्रॉयलर अंड्यांचाही भाव सध्या वाढत आहे. सध्या अंड्यांचे (Egg) घाऊक दर वाढताना ७२० रुपयांना शंभर नग असा झाला आहे. सध्या बाजारात १०० रुपये डझन याप्रमाणे अंड्यांची विक्री होत आहे. आणखी काही दिवस तरी ब्रॉयलर अंड्यांचे दर चढेच राहण्याची शक्यता आहे. दरवाढीमुळे आवश्‍यक प्रमाणात चिकन खरेदी करणे शक्य होत नसल्यामुळे खवय्यांत नाराजी पसरली आहे, असे मत देविदास गावकर यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com