Chicken Cancer Risk: चिकन खाल्ल्याने वाढतो कॅन्सरचा धोका? संशोधनातून खुलासा; नॉनव्हेज लव्हर्सची वाढली चिंता

Chicken And Cancer Risk Study: जर तुम्हाला चिकन खाण्याची आवड असेल तर आधी अमेरिकेत झालेले संशोधन वाचा. 19 वर्षे चाललेल्या या संशोधनात 4000 लोकांचा समावेश करण्यात आला. संशोधनाचे निकाल खूपच धक्कादायक आहेत.
Chicken And Cancer Risk Study
Chicken Cancer RiskDainik Gomantak
Published on
Updated on

जर तुम्हाला चिकन खाण्याची आवड असेल तर आधी अमेरिकेत झालेले संशोधन वाचा. 19 वर्षे चाललेल्या या संशोधनात 4000 लोकांचा समावेश करण्यात आला. संशोधनाचे निकाल खूपच धक्कादायक आहेत. हे आपल्या आरोग्याशी संबंधित आहेत. जर तुम्हाला चिकन खाण्याची आवड असेल तर तुम्हाला याबाबत पुनर्विचार करावा लागू शकतो. संशोधकांनी आठवड्यातून फक्त 300 ग्रॅम चिकन खाण्यावर संशोधन केले. आठवड्यातून 300 ग्रॅम चिकन खाल्ल्याने मृत्यूचा धोका 27 टक्क्यांनी वाढतो. तर आठवड्यातून 300 ग्रॅमपेक्षा जास्त चिकन खाणाऱ्यांमध्ये हाच धोका दुप्पट होतो.

कॅन्सरचा धोका 27 टक्क्यांनी वाढतो

दरम्यान, आपल्या देशात मांसाहार म्हणून चिकन मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. सामान्यतः असे मानले जाते की, चिकन (Chicken) आरोग्यासाठी चांगले असून ते व्हिटॅमिन बी-12 आणि कोलीन प्रदान करते, जे मेंदूसाठी चांगले असतात. असे बरेच लोक आहेत जे दररोज चिकन खातात. मात्र अमेरिकेत झालेले हे संशोधन वाचल्यानंतर त्यांचे डोळे उघडू शकतात. संशोधनानुसार, आठवड्यातून 300 ग्रॅम चिकन खाल्ल्याने गॅस्ट्रोइंटेस्टाइनल कॅन्सरचा धोका 27 टक्क्यांनी वाढतो.

Chicken And Cancer Risk Study
Lung Cancer: शरीर देते फुफ्फुसाच्या कर्करोगाचे संकेत, 'या' लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करु नका; वेळीच घ्या उपचार

संशोधनात आणखी काय खुलासा झाला?

19 वर्षे चार हजार लोकांवर केलेल्या संशोधनातून असेही दिसून आले की, महिलांपेक्षा पुरुषांना या कॅन्सरचा धोका जास्त असतो. न्यूट्रिएंट्समध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, हे संशोधन गॅस्ट्रोइंटेस्टाइनल कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येबाबत करण्यात आले. संशोधनात, 2020-2025 च्या आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वांच्या NIOM चे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Chicken And Cancer Risk Study
Colorectal Cancer: 'कोलन' कर्करोगावर मात करण्यासाठी 'व्हिटॅमिन डी' कसं ठरतं संरक्षक? संशोधनातून मोठा खुलासा समोर

आता घाबरण्याची गरज नाही

आठवड्यातून 100 ग्रॅम चिकन खाणे बऱ्याच प्रमाणात सुरक्षित असल्याचे संशोधनात सांगण्यात आले. परंतु आठवड्यातून 300 ग्रॅम किंवा त्याहून अधिक चिकन खाणाऱ्यांबद्दल अजून संशोधन आवश्यक आहे. संशोधकांनी त्यांच्या संशोधनात व्यायाम आणि जीवनशैलीचा समावेश केला नाही. संशोधनानुसार, प्रक्रिया केलेले चिकन, व्यायाम आणि जीवनशैली यावरही संशोधन आवश्यक आहे. मात्र सध्या संशोधकांनी चिकन कमी प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com