Goa Chicken Shortage: गोव्यातील 'बॉयलर चिकन'चा पुरवठा सुरळीत होणार?

Goa Changadh Meeting: गोव्यात पुन्हा एकदा चिकनचा पुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती गोवा पोल्ट्री फार्मर्स अँड ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष जयकृष्ण नाईक यांनी दिली
Goa poultry news
Goa poultry newsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यात गेल्या काही दिवसांपासून बॉयलर चिकनचा तुटवडा जाणवत होता आणि महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर अतिरिक्त शुल्क आकारणी केली जात असल्याचा आरोप केला जात होता. मात्र आता हा वाद संपुष्टात आला असल्याची शक्यता असून गोव्यात पुन्हा एकदा चिकनचा पुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती गोवा पोल्ट्री फार्मर्स अँड ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष जयकृष्ण नाईक यांनी दिली आहे.

चंदगडमधून चिकन पुरवठा करणाऱ्या लोकांवर गोव्यातील हद्दीत काही निर्बंध लावण्यात आले होते आणि म्हणूनच हा वाद सुरु झाला आणि निषेदार्थ चंदगडमधील व्यापाऱ्यांनी गोव्यात होणारा चिकनचा पुरवठा थांबला होता.

Goa poultry news
Goa Chicken Shortage: गोव्यात 'बॉयलर चिकन'चा तुटवडा; महाराष्ट्रातील आमदार घालणार लक्ष, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

यापूर्वी कोल्हापुरचे आमदार शिवाजी पाटील यांनी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन बॉयलर चिकन तुटवड्यावर चर्चा केली होती तसेच चिकन तुटवड्याबाबत लवकरच महाराष्ट्र आणि गोवा पोल्ट्री असोसिएशनची बैठक होणार असल्याची माहिती दिली होती.

गोवा पोल्ट्री फार्मर्स अँड असोसिएशनचे अध्यक्ष जयकृष्ण नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार आता शुक्रवारी (१७ जानेवारी) रोजी होणाऱ्या बैठकीत यावर तोडगा काढला जाईल. चंदगडमधून गोव्यात दरदिवशी ७० टन चिकनची विक्री होते, मात्र कर्नाटकमधून देखील चिकनचा पुरवठा होत असल्याने तुटवडा भासत नाहीये. चंदगड येथून येणारे चिकन हे चांगले नसते, त्या कोंबडया रोगट असतात, याची माहिती त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली असून मुख्यमंत्र्यांनी देखील ही मागणी स्वीकारण्याचे आश्वासन दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com