Goa Rain Update: आज ऑरेंज अलर्ट! जोरदार पावसाची शक्यता; गेल्या २४ तासांत ७६ मिमी पाऊस

Goa Monsoon: संततधार पावसामुळे पाणी पातळीत वाढ, रस्त्यांवर पाणी साचले, वास्कोत दरड कोसळली; जनजीवन विस्कळीत
Goa Monsoon: संततधार पावसामुळे पाणी पातळीत वाढ, रस्त्यांवर पाणी साचले, वास्कोत दरड कोसळली; जनजीवन विस्कळीत
Goa WeatherCanva
Published on
Updated on

पणजी: तब्बल दहा-बारा दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने काल रात्रीपासून दमदार पुनरागमन केले. संततधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले. वास्कोत दरड कोसळली. तसेच जनजीवन विस्कळीत झाले.

गेल्या २४ तासांत राज्यात एकूण ७६ मिमी म्हणजेच सुमारे ३ इंच पावसाची नोंद केली असून आतापर्यंत एकूण ३६०७.१ मिमी म्हणजेच १४२.०१ इंच पावसाची नोंद केली आहे. रविवारी राज्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तवत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

सकाळ पासून सातत्याने बरसत असलेल्या पावसामुळे रगाडा, म्हादई आणि वाळवंटी नद्या तुडूंब भरल्या. बाराजण उसगाव शाळेत पाणी साचल्याने पालकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याकडून दुरस्थिच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. बोगदा -मुरगाव रस्त्यावर सकाळी दरड कोसळल्याने वाहतूक बंद झाली होती दरडीची माती दगड बाजूला काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते.

आंदोलन इशाऱ्यानंतर ‘साबांखा’ला जाग

बाराजण - उसगाव येथील सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या आवारात शनिवारी सकाळी मुसळधार पावसामुळे गटारातील पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना या घाण पाण्यातून वाट काढत वर्गात प्रवेश करावा लागला. यावेळी पालकांनी नाराजी व्यक्त केली. या ठिकाणी पाणी तुंबू नये, यासाठी उपाययोजना केली नाही तर पालकांना घेऊन विद्यालयासमोर आंदोलनाचा इशारा स्थानिक पंच मनीषा उसगावकर यांनी देताच ‘साबांखा’ला त्वरित जाग आली आणि त्यांनी दुरुस्ती कामाला सुरवात केली.

काणकोणात सर्वाधिक पाऊस

गेल्या २४ तासांत राज्यात सर्वाधिक ११९.४ मिमी म्हणजेच ४.७० इंच पावसाची नोंद काणकोण येथे केली. त्याखालोखाल साखळी ९६.८ मिमी, जुने गोवे ८६ मिमी, सांगे ८० मिमी, दाबोळी ७८.४ मिमी, म्हापसा ७४ मिमी, फोंडा ७०.८ मिमी, मुरगाव ७०.१ मिमी, पणजी ६७ मिमी, वाळपई ६४.१ मिमी, मडगाव ५१.६ मिमी, पेडणे येथे ४२.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

Goa Monsoon: संततधार पावसामुळे पाणी पातळीत वाढ, रस्त्यांवर पाणी साचले, वास्कोत दरड कोसळली; जनजीवन विस्कळीत
Goa Rain Update: सर्वच केंद्रांवर पावसाची शतकी खेळी! वाळपई, सांगे, साखळीत १५० पार

कोठे काय घडले?

म्हादई, वाळवंटी, रगाडा नदीच्या पाणी पातळीत वाढ. खंदकातून पाणी बाहेर न सोडण्याची डिचोलीतील व्यापाऱ्यांची मागणी. वास्को-बोगदा रस्त्यावर कोसळली दरड. बाराजण-उसगाव शाळेत साचलेल्या पाण्यामुळे पालक आक्रमक.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com