
पेडणे: धारगळ येथे होणाऱ्या सनबर्न ईडीएम फेस्टिव्हलवरुन पेडणे परिसरात कमालीची चलबिचलता निर्माण झाली असून, विरोधकांसह समर्थकांच्या तातडीच्या बैठका आज (1 December) सायंकाळी होऊ घातल्या आहेत. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी दक्षता घेतली आहे.
पेडणेतील (Pernem) आम आदमी पक्षातर्फे सनबर्नला परवानगी देऊ नये, अशा आशयाचे पत्र पंचायतीला देण्यात आले आहे. तर धारगळ पंचायतीसमोर महोत्सवाच्या विरोधात एकत्र येण्यासाठी करण्यात आलेल्या आवाहनानंतर पोलिसांनी काही जणांना कलम 168 अंतर्गत नोटिसा जारी केल्या आहेत. पोलिसांच्या कृतीविरोधात लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पेडणेत सनबर्न या विषयावरून जागोजागी चर्चा झडत आहेत.
धारगळ (Dhargal) येथे सनबर्नसाठी जी जागा निवडण्यात आली आहे, त्या भागात रुग्णालये आहेत आणि त्यामुळे तिथे आयोजनाला परवानगी देणे योग्य नाही, अशी भूमिका अनेकांनी घेतली असतानाच समर्थनार्थ एक गट उभा ठाकला आहे. सनबर्नमुळे व्यावसायिक चालना मिळेल, अशी त्यांची भूमिका आहे. परिणामी ईडीएम आयोजनावरुन पेडणेकर विरुद्ध पेडणेकर अशी स्थिती निर्माण झाली आहे.
1. परवानगी मिळाली नसताना आयोजकांनी तयारी सुरु केल्याने अनेकांनी सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. जी काही भूमिका घ्यायची ती उघड घ्यावी, असे त्यांचे म्हणणे आहे.
1. पेडणेतील दोन्ही आमदारांनी आम्ही नागरिकांसोबत राहणार, असे यापूर्वी जाहीर केले आहे. त्यामुळे सायंकाळी होणाऱ्या सभेत ते काय भूमिका घेतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.