Goa Board SSC Result 2025: गोवा बोर्डाचा 10 वीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी

Goa Board SSC Result: गोवा शालान्त मंडळाने घेतलेल्या दहावी परीक्षेच्या निकाल सोमवारी (07 एप्रिल) सायंकाळी पाच वाजता जाहीर झाला. यंदाही पुन्हा एकदा दहावीच्या परिक्षेत मुलींनीच बाजी मारली. राज्याचा 95.35 टक्के एवढा निकाल लागला.
Goa Board SSC Result 2025:
Goa Board SSC Result 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Board Class 10 Results 2025 Declared 95.35% Overall Pass Percentage

पणजी: गोवा शालान्त मंडळाने घेतलेल्या दहावी परीक्षेच्या निकाल सोमवारी (07 एप्रिल) सायंकाळी पाच वाजता जाहीर झाला. यंदाही पुन्हा एकदा दहावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली. राज्याचा 95.35 टक्के एवढा निकाल लागला, ज्यामध्ये 95.71 टक्के मुली तर 94.98 टक्के मुले उत्तीर्ण झाली. निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला. 

18,832 विद्यार्थी परीक्षेला बसले

दरम्यान, गोवा शालान्त मंडळाकडून यावर्षी 1 ते 21 मार्च 2025 या काळात दहावीच्या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. 32 केंद्रावर घेण्यात आलेल्या या परीक्षेला (Exam) 18,832 विद्यार्थी बसले होते. यामध्ये 9280 मुले आणि 9,558 मुलींचा समावेश होता.

Goa Board SSC Result 2025:
Goa Board SSC Result 2023: मुलीच हुश्शार! 10 वीत 96.64 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, जाणून घ्या सविस्तर निकाल

गेल्या वर्षी 92.38 टक्के एवढा निकाला लागला

गेल्या वर्षी गोव्यात (Goa) 18,914 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. यापैकी 17,473 विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. गेल्या वर्षी दहावीचा निकाल 92.38 टक्के एवढा लागला होता. दरम्यान, निकालपत्र वितरणाची तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com