मग एवढी वर्षे भाजपा झोपला होता का?

दामू नाईक यांच्या विधानाचा आपकडून खरपूस समाचार
AAP Goa: 'आप'च्या गोवा राज्य प्रभारी आणि दिल्लीच्या आमदार अतिशी व 'आप'चे वाल्मिकी नाईक
AAP Goa: 'आप'च्या गोवा राज्य प्रभारी आणि दिल्लीच्या आमदार अतिशी व 'आप'चे वाल्मिकी नाईकDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: 'आप'ने (AAP) गोव्यात रोजगार निर्मितीची घोषणा केल्याबरोबर भाजपच्या (BJP) नेत्यांत खळबळ उडाली आहे. त्यामुळे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सारवासारव करण्याची घाई केली. मात्र, राज्यात दहा वर्षे सरकार असतांना आपण काय केले, याचा खुलासा भाजपच्या नेत्यांंना करता आलेला नाही. यावरूनच भाजप सरकार अपयशी ठरल्याचे दिसते. दहा वर्षांपासून दहा हजार नोक-या देण्याची घोषणा केली जात आहे, त्या नोक-यांचे काय झाले याचे उत्तर डॉ.प्रमोद सावंत (CM Dr Pramod Sawant) देतील का? असा सवाल आपच्या गोवा राज्य प्रभारी आणि दिल्लीच्या आमदार अतिशी (AAP Goa In charge & Delhi MLA Atishi) यांनी उपस्थित केला.

AAP Goa: 'आप'च्या गोवा राज्य प्रभारी आणि दिल्लीच्या आमदार अतिशी व 'आप'चे वाल्मिकी नाईक
Goa Election: 20 मिनिटांची भेट आणि उत्पल पर्रीकर रिंगणात

आप’ राज्यात तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करू शकत नाही, असे भाजप म्हणत आहे, मग गेल्या दहा वर्षात भाजपने झोपा काढल्या काय. दहा हजार नोकऱ्या देण्याची घोषणा गेल्या दहा वर्षांपासून भाजप करीत आहे. त्या नोकऱ्या कुणाला दिल्या आणि त्याचे काय झाले याचा खुलासा करावा, असे थेट आव्हान आपच्या गोवा राज्य प्रभारी आणि दिल्लीच्या आमदार अतिशी यांनी केले. यावेळी त्यांच्यासमवेत आपचे प्रवक्ते वाल्मिकी नाईक उपस्थित होते.

AAP Goa: 'आप'च्या गोवा राज्य प्रभारी आणि दिल्लीच्या आमदार अतिशी व 'आप'चे वाल्मिकी नाईक
Goa Election: निवडणुकीत बाबू आजगावकर यांना धारगळ पंचायतीचा पूर्ण पाठींबा

काल मंगळवारी आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राज्यातील युवकांकाठी सप्तसुत्री जाहिर केली होती. त्यावर टीका करतांंना भाजपने 'आप' राज्यातील तरूणांना रोजगार देऊच शकत नाही, असा आरोप केला. त्यावर पत्रकार परिषदेत बोलतांना आमदार अतिशी यांनी दिल्लीत केजरीवाल सरकारने अनेक गोष्टी शक्य करून दाखविल्या आहेत. भाजप जर 'आप'ला गोव्यात रोजगार निर्मिती करणे शक्य नाही म्हणत असेल, तर गेल्या दहा वर्षात त्यांनी काय केले, याचे उत्तर द्या असे थेट आवाहनच दिले.

AAP Goa: 'आप'च्या गोवा राज्य प्रभारी आणि दिल्लीच्या आमदार अतिशी व 'आप'चे वाल्मिकी नाईक
'सरकार तुमच्या दारी' उपक्रम मते मिळवण्यासाठीच

यावेळी बोलतांना 'आप'चे वाल्मिकी नाईक म्हणाले, आपच्या घोषणा म्हणजे मनोरंजन असते, असे भाजपचे नेते सांगत आहेत, मग त्यांना पत्रकार परिषद घेऊन खुलासा का करावा लागतो ? आणि खुलासा करण्यासाठीही त्यांना तब्बल 24 तास लागले, यावरूनच राज्यातील जनतेने भाजपची नियत ओळखली आहे, असे वाल्मिकी म्हणाले.

दामू नाईक यांच्या विधानाचा समाचार

दिल्लीला केंद्राकडून निधी मिळतो या दामू नाईक यांच्या विधानावर टिका करताना आतिशी यांनी दामू नाईक यांचा खरपूस समाचार घेतला. पत्रकार परिषद घेण्यापूर्वी दामू नाईक यांनी अभ्यास करावा. दिल्ली हे एकमेव राज्य आहे जे केवळ स्वतःच्या बजेटमधून काम करते, केंद्राकडून नाही. त्यामुळे भाजपच्या दामू नाईक यांनी ‘आप’चे सर्वेसर्वा तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आदर्श घ्यावा, आतिशी यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com