मोरजी: विधानसभेची निवडणूक (Assembly elections) २०२२ साली होणार आहे, या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (Deputy Chief Minister Babu Azgawkar) यांना धारगळ पंचायतीचा (Dhargal Panchayat) पूर्ण पाठींबा असेल, त्यांना विजयी करण्यासाठी आमचा प्रयत्न असेल, असे नवनिर्वाचित धारगळ सरपंच भूषण उर्फ प्रदीप नाईक यांनी जाहीर केले.
भूषण नाईक यांची धारगळ सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी सरपंचाची भेट घेवून त्यांचे अभिनंदन केले. त्याच वेळी सरपंच भूषण नाईक यांनी स्थानिक पत्रकारांकडे बोलताना आगामी निवडणुकीत आमच्या पूर्ण पंचायत मंडळाचा पूर्ण पाठींबा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांना असणार असल्याचे जाहीर केले.
यावेळी जिल्हा पंचायत सदस्य अध्यक्ष कार्तिक कुंडईकर, धारगळ जिल्हा पंचायत सदस्य मनोहर धारगळकर, सुनीता राऊळ, प्रदीप पटेकर आदी उपस्थित होते.
यावेळी बुशन नाईक यांनी बोलताना यापुढे आम्ही काम करणार ते केवळ भाजपासाठी आणि आगामी निवडणुकीत केवळ उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनाच पाठींबा देणार असल्याचे जाहिर केले.
धारगळकचे नऊही पंचायत मंडळ केवळ बाबू आजगावकर याना पाठींबा देवून त्यांच्या विजयासाठी कार्यरत राहणार असल्याचे सांगितले.
उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्याकडून आम्ही धारगळ पंचायत क्षेत्रात सार्वजनिक स्मशानभूमी उभारली जाणार आहे. शिवाय पंचायतीची १००० चौरस मीटर जागा आहे त्यात मार्केट कोम्पेक्ष व सभाग्रह उभारण्याचा संकल्प आहे आणि सरकारच्या माध्यमातून तो प्रकल्प उभारला जाणार असल्याचे सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.