Pramod Sawant: 'हा हिंदू समाजाचा अपमान', राहुल गांधींनी माफी मागावी, गोव्याचे मुख्यमंत्री आक्रमक

Parliament Session 2024: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर चर्चा करताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विधानावरून लोकसभेत गदारोळ झाला.
'हा हिंदू समाजाचा अपमान', राहुल गांधींनी माफी मागावी, गोव्याचे मुख्यमंत्री आक्रमक
Goa CM Pramod SawantDainik Gomantak

'स्वतःला हिंदू म्हणून घेणारे हिंसाचार भडकवत आहेत', असे वक्तव्य लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केल्यानंतर यांच्या विरोधात भाजप नेते आक्रमक झाले आहेत. सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वक्तव्याचा निषेध केल्यानंतर आता गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राहुल गांधींनी हिंदू समाजाची माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याप्रकरणी सोशल मिडिया एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. "हीच काँग्रेसची नफरत की दुकान. हिंदू समाजाला हिंसव बोलणे हा त्यांचा अपमान आहे. जगभरातील करडो हिंदू लोकांची राहुल गांधींनी माफी मागावी. इंडिया आणि काँग्रेस नेत्यांचा हा उद्धटपणा निंदनीय आहे," असे ट्विट सावंत यांनी केले आहे.

'हा हिंदू समाजाचा अपमान', राहुल गांधींनी माफी मागावी, गोव्याचे मुख्यमंत्री आक्रमक
Assagao case: पूजा शर्माची चौकशीला दांडी, अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

राहुल गांधी यांनी हिंदू समाजाला हिंसक म्हटले आहे. सनातन धर्माला नष्ट करण्याचा उद्देश इंडि आघाडीच्या नेत्यांनी बोलून दाखवला आहे. राहुल गांधी त्यांच्या नियोजनबद्ध योजनेचे ध्येय बोलून दाखवत आहेत. या धोक्याचा सामना करण्यासाठी सर्व हिंदूंना एकत्र लढण्यासाठी तयार रहायला हवं, असे ट्विट गोवा भाजपने म्हटले आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर चर्चा करताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विधानावरून लोकसभेत गदारोळ झाला. राहुल गांधींच्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी दोनदा उठून उभे राहिले. गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही त्यांच्या भाषणावर विविध मुद्यांवर आक्षेप घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात राहुल गांधींच्या हिंदुत्वावरील वक्तव्यावर आक्षेप घेतला, तर अग्निवीरवर केलेल्या वक्तव्याचा राजनाथ सिंह यांनी निषेध नोंदवला. राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गृहमंत्री अमित शहा यांनी अनेकवेळा विविध विषयांवर आक्षेप घेतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com