BJP To Introspect South Goa Defeat: दक्षिणेत पल्लवी धेंपेंचा पराभव का झाला? भाजप कारणांचा शोध घेणार

BJP To Introspect South Goa Defeat: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेटपणे पल्लवी धेंपे यांना उमेदवारी दिली असतानाही ती जागा का जिंकू शकलो नाही, याची कारणमीमांसा आता भाजप करणार आहे.
Pallavi Dempo
Pallavi DempoDainik Gomantak

BJP To Introspect South Goa Defeat

40 पैकी 33 आमदारांचा भक्कम पाठिंबा असतानाही लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकणे शक्य झाले नाही. दक्षिण गोव्याची जागा तब्बल १४ हजार ७०३ मतांनी गमवावी लागल्यानंतर भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेटपणे पल्लवी धेंपे यांना उमेदवारी दिली असतानाही ती जागा का जिंकू शकलो नाही, याची कारणमीमांसा आता भाजप करणार आहे. त्यासाठी चिंतन बैठकीचेही आयोजन केले जाणार आहे, अशी माहिती मिळाली आहे.

सासष्टीतून कॉंग्रेसला ६१,८५० मतांची आघाडी मिळाली, तर इतर ११ मतदारसंघांतून भाजपला केवळ ५२,२५५ मतांची आघाडी मिळाली. यामुळे सासष्टीत मिळालेल्या आघाडीच्या आधारे कॉंग्रेसचे उमेदवार कॅप्टन विरियातो यांना विजय मिळविणे सोपे झाले. काणकोणमध्ये माजी आमदार विजय पै खोत, माजी उपसभापती इजिदोर फर्नांडिस

Pallavi Dempo
Goa Loksabha Election Result: मयेवासीयांची श्रीपाद नाईकांना ‘विक्रमी’ साथ; विरोधकांचा स्वप्नभंग !

आणि सभापती रमेश तवडकर यांनी भाजपला पाठिंबा दिला असतानाही अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही. केपेतून कॉंग्रेसचे मताधिक्य कमी करण्यात माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांना यश आले नाही. दाबोळीतून मंत्री माविन गुदिन्हो, वास्कोतून दाजी साळकर व मुरगावमधून मिलींद नाईक, आमदार आमोणकर हेही मताधिक्य देऊ शकले नाहीत.

कुठ्ठाळीचे आमदार आंतोन वाझ भाजपसोबत असून गिरीश पिल्लई, रमाकांत बोरकर यांना भाजपात आणूनही तेथे कॉंग्रेसला रोखता आले नाही. मडगाववर कामत यांची पकड असूनही भाजपला मोठे मताधिक्य मिळाले नाही. नुवेचे सिक्वेरा यांना मंत्रिपद तसेच रेजिनाल्डनही अपेक्षित मते देऊ शकले नाहीत.

मडकई वगळता अन्यत्र अपयश

सावर्डे, कुडचडे, शिरोडा, फोंडा मतदारसंघात दमदार कामगिरी झालीच नाही. मडकई वगळता इतर मतदारसंघात मताधिक्य मिळवून देण्यात आलेले अपयश भाजपला भोवले आहे. या सगळ्यांची कारणमीमांसा होणार आहे.

मंत्रिमंडळात फेरबदल शक्य

उत्तर गोव्यात श्रीपाद नाईक यांनी आपले मताधिक्य वाढविले. त्यासाठी कोणते घटक कारणीभूत ठरले, हेही तपासले जाणार आहे. या चिंतन बैठकीतून येणाऱ्या मुद्यांच्या आधारे भाजप पक्ष संघटनात्मक व मंत्रिमंडळ पातळीवर फेरबदल करणार असल्याचे समजते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com