BJP Organisation: गोव्यात भाजपच्या संघटन विस्ताराची तयारी; तळागाळातील संपर्क वाढविण्यासाठी प्रवासी विस्तारकांना विशेष मार्गदर्शन

Goa BJP Organisational Expansion: भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराला अधिक गती देण्याच्या उद्देशाने भाजप मुख्यालयात प्रवासी विस्तारकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
Goa BJP Organisational Expansion
BJP OrganisationDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराला अधिक गती देण्याच्या उद्देशाने भाजप मुख्यालयात प्रवासी विस्तारकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, भाजपचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, राष्ट्रीय संघटक व्ही. सतीश आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेला भाजपचे नेते अनिल अँटोनी, सर्वानंद भगत, मंडळ प्रभारी, मंडळ अध्यक्ष तसेच पक्षाचे अन्य ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविणे, तळागाळातील कार्यकर्त्यांचे जाळे अधिक सक्षम करणे आणि संघटनात्मक उपक्रमांना नव्याने गती देणे, हा कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता.

Goa BJP Organisational Expansion
Goa Politics: फातोर्ड्यात साकव दुरुस्तीवरून राजकीय संघर्ष; दामू नाईक यांच्या सांगण्यावरून काम बंद पाडल्याचा विजय सरदेसाईंचा आरोप

राष्ट्रीय स्तरावरील संघटनात्मक नेतृत्व आणि राज्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमुळे या कार्यशाळेला विशेष महत्त्व प्राप्त झाले. पक्षाच्या संघटनात्मक कामकाजात समन्वय वाढविणे, स्थानिक पातळीवरील पक्षयंत्रणा अधिक गतिमान करणे आणि तळागाळातील संपर्क मजबूत करणे, यावर मार्गदर्शन करण्यात आले. आगामी काळात पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रवासी विस्तारकांनी सक्रियपणे काम करावे, या दृष्टीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

विस्तारकांची भूमिका महत्त्वाची

प्रवासी विस्तारकांच्या माध्यमातून पक्षाचे संघटन अधिक व्यापक करण्यावर या कार्यशाळेत लक्ष केंद्रित करण्यात आले. विविध भागांमध्ये पक्षाचे कार्य पोहोचविणे, स्थानिक पातळीवरील संघटनात्मक संपर्क वाढविणे आणि कार्यकर्त्यांना अधिक सक्रिय करणे, या दृष्टीने विस्तारकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

Goa BJP Organisational Expansion
Goa Politics: दयानंद मांद्रेकरांचा महामंडळ अध्यक्षपदाचा राजीनामा; भाजपमधील अस्वस्थतेमुळे 2027 च्या निवडणुकीआधी राजकीय चर्चांना उधाण

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.