Goa Politics: फातोर्ड्यात साकव दुरुस्तीवरून राजकीय संघर्ष; दामू नाईक यांच्या सांगण्यावरून काम बंद पाडल्याचा विजय सरदेसाईंचा आरोप

Fatorda Bridge Repair Work: फातोर्ड्यात साकव दुरुस्तीवरून गोवा फॉरवर्डचे फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई व भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत.
Fatorda Bridge Repair Work
Goa PoliticsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

सासष्टी: फातोर्ड्यात साकव दुरुस्तीवरून गोवा फॉरवर्डचे फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई व भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. साकवाचेच नव्हे तर फातोर्ड्यातील सरकारी मंजुरी मिळेलेलीही अनेक विकासकामे बंद पाडण्यात येत असल्याचा आरोप विजय सरदेसाई यानी शनिवारी केला.

‘पीपल्स पाथ’चे कामही बंद पाडण्याचा प्रयत्न झाला होता, असे सरदेसाई यांनी सांगितले. आगाळी-फातोर्डा येथील ३५ वर्षांपूर्वीच्या साकवाच्या (लहान पूल) दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ ५ नोव्हेंबर रोजी करण्यात आला होता. आता हे सुरू केलेले काम प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या सांगण्यावरूनच सार्वजनिक बांधकाम खात्याने बंद पाडल्याचा आरोप विजय सरदेसाई यांनी केला आहे.

Fatorda Bridge Repair Work
Goa Politics: दयानंद मांद्रेकरांचा महामंडळ अध्यक्षपदाचा राजीनामा; भाजपमधील अस्वस्थतेमुळे 2027 च्या निवडणुकीआधी राजकीय चर्चांना उधाण

या साकवाच्या दुरुस्तीचे काम हे सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फतच सुरू करण्यात आले होते. साबांखा मंत्री दिगंबर कामत तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यामार्फतच ही फाईल मंजूर करण्यात आली. निविदा जाहीर करून कंत्राटदाराला कामाचा आदेशही देण्यात आला. काम सुरूही झाले होते. एकदा सुरू केलेले काम बंद पाडणे हे कसले प्रशासन, असा प्रश्न सरदेसाई यांनी केला आहे.

दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?

माजी नगरसेविका निमिशा फालेरो, जुझे फर्नांडिस व पीटर फर्नांडिस यांनी साकवाच्या दुरुस्तीचे काम बंद पाडल्याचा निषेध केला. हा साकव (लहान पूल) खालून मोडकळीस आलेला आहे. कॉंक्रिटमधील लोखंड सडलेले आहे व ते बाहेर दिसत आहे. कामाची ऑर्डर आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी रस्ता बंद व रस्ता बदलाची मान्यताही असताना हे काम बंद का पाडले? जर साकव कोसळला व दुर्घटना घडली तर त्याला कोण जबाबदार? असे प्रश्न जुझे फर्नांडिस यांनी उपस्थित केले आहेत.

Fatorda Bridge Repair Work
Goa Dairy Employees: गोवा डेअरी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला खासदार विरियातो फर्नांडिस यांचा पाठिंबा; सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.