Karnataka Assembly Elections: कर्नाटक निवडणूक प्रचारासाठी गोव्यातून भाजप नेत्यांची फौज

विधानसभा रणांगण : मुख्यमंत्री सावंत यांच्यासह पाच नेते जाणार
Goa BJP leaders
Goa BJP leaders Dainik Gomantak

कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी गोव्यातून भाजपने नेत्यांची फौजच पाठविण्याचे निश्‍चित केले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे भाजपचे स्टार प्रचारक असणार आहेत.

तर आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांच्यासह सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर हेही प्रचारासाठी जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी या पक्षीय जबाबदाऱ्या जाहीर केल्या आहेत.

Goa BJP leaders
Happy Easter 2023 : राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून जनतेला ईस्टरच्या शुभेच्छा

मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे स्टार प्रचारक आहेत. त्यामुळे त्यांची अधून-मधून ये-जा असू शकते. साखळी नगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे त्यांना दोन्हीकडे लक्ष घालावे लागणार आहे. त्यामुळे कर्नाटकातील प्रचाराच्या तारखा आणि वेळही त्यांच्या सोयीनेच ठरविली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

याशिवाय भाजपकडून माविन गुदिन्हो, सुभाष शिरोडकर, ॲड. नरेंद्र सावईकर, दामू नाईक, आमदार मायकल लोबो, प्रेमेंद्र शेट, उल्हास तुयेंकर, दाजी साळकर, प्रवीण आर्लेकर, केदार नाईक आणि माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर हे नेते प्रचारासाठी कर्नाटकमध्ये जाणार असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली.

याशिवाय या सर्व नेत्यांना कोणता मतदारसंघ आणि कोणत्या तारखेपासून जबाबदारी स्वीकारायची हे सर्व सोमवारपर्यंत कळविले जाण्याची शक्यता आहे.

Goa BJP leaders
Smart City Panaji : बाबूश यांच्या कानपिचक्यांमुळे रोहित नरमले; कंत्राटदारांना केल्या सूचना

हल्याळची जबाबदारी राणेंकडे

विश्‍वजीत राणे यांच्यावर उत्तर कन्नड जिल्ह्यातील सहा मतदारसंघांची जबाबदारी आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ह्ल्याळ या मतदारसंघाची संपूर्ण जबाबदारी राणे यांच्याकडे दिलेली आहे.

मंगळवार 11 एप्रिलपासून मतदान होईपर्यंत स्थानिक नेतेमंडळींना सोबत घेऊन प्रचाराचे पूर्ण नियोजन करण्याची जबाबदारी राणे यांच्यावर आहे.

राणे बोलतात अस्खलित कन्नड!

विश्वजीत राणे यांना कन्नड भाषा अस्खलितपणे बोलता येते. पक्षाचे राष्ट्रीय महामंत्री तरुण चुग यांनी विश्‍वजीत यांना पत्राद्वारे प्रचाराच्या जबाबदारीची कल्पना दिली आहे. त्याशिवाय इतर नेत्यांना सोमवारपर्यंत कोणत्या मतदारसंघाची कोणावर जबाबदारी दिली आहे, हे स्पष्ट होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com