Smart City Panaji : बाबूश यांच्या कानपिचक्यांमुळे रोहित नरमले; कंत्राटदारांना केल्या सूचना

आयुक्तांना सोबत घेऊन पणजीतील कामांची पाहणी
Babush & son Rohit Monserrate on Board of Directors of Panaji Smart City Project
Babush & son Rohit Monserrate on Board of Directors of Panaji Smart City ProjectDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पाची कामे जोरात सुरू आहेत. पावसाळ्यात या कामांमुळे पाणी साचण्याची शक्यता आहे. शिवाय रस्ता खोदकामामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया पाहून महापौर रोहित मोन्सेरात यांनी हात ‘वर’ केले होते.

या स्थितीला ‘स्मार्ट सिटी’वाले जबाबदार असतील, असे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी महापौरांना कानपिचक्या दिल्यामुळे त्यांनी कामांची पाहणी करत कंत्राटदारांना सूचना केल्या.

शहराचा प्रथम नागरिक म्हणून जबाबदारीची जाणीव कदाचित बाबूश यांनी पुत्र रोहित यांना करून दिली आहे. काही दिवसांपूर्वी घडलेल्या चुकांवर पांघरूणही त्यांनी घातल्याची चर्चा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.

Babush & son Rohit Monserrate on Board of Directors of Panaji Smart City Project
Goa Fire News : खोतिगाव, गावडोंगरी येथे जंगलाला पुन्हा आग

मंत्र्यांचे आवाहन

महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनीही ‘कामे लवकरच पूर्ण होतील, थोडी कळ सोसा’, असे आवाहन पणजीवासीयांना केले होते. जिल्हाधिकाऱ्यांनीही महापौर आणि आयुक्त शहरातील कामांविषयी जागोजागी भेट देत असल्याचे सांगितल्याने महापौरांना नक्कीच धीर मिळाला असेल, अशी चर्चा सुरू आहे.

विरोधकांची टीका

‘स्मार्ट सिटी’च्या कामांमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीला महापालिका जबाबदार नाही, असे जाहीरपणे रोहित मोन्सेरात यांनी सांगितले होते. याचीच ‘री’ पकडून अनेकांनी महापालिका आता जबाबदारी झटकत असल्याची टीका केली आहे.

Babush & son Rohit Monserrate on Board of Directors of Panaji Smart City Project
Goa Municipality Elections : मुख्यमंत्री, कृषिमंत्र्यांच्या प्रतिष्ठेचा लागणार कस

यंदा गटारे तुंबणार नाहीत

मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी दिलेला उतारा कामी आल्यामुळेच की काय, शुक्रवारी महापौर आयुक्तांना सोबत घेऊन कामांची पाहणी करण्यासाठी रस्त्यावर उतरले.

शिवाय ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत सुरू असलेल्या गटारांच्या कामाची पाहणी करताना कंत्राटदारांना कामे दर्जेदार करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

तसेच ‘स्मार्ट सिटी’च्या कामांमुळे गटारांची दुरुस्ती होत असल्याने पावसाळ्यात पाणी साचण्याचे फारसे प्रकार घडणार नाहीत, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com