गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील जनतेला विशेषतः ख्रिश्चन बांधवांना ईस्टरच्या शुभप्रसंगी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, "ईस्टर हा जगातील सर्व लोकांसाठी एक महत्त्वाचा दिवस आहे. ईस्टर हा पवित्र दिवस असून भगवान येशू ख्रिस्त मानवतेसाठी सर्वोच्च त्यागाचे प्रतीक आहेत."
"येशू ख्रिस्तांना वधस्तंभावर मारणे आणि त्याचे पुनरुत्थान होणे हे वाईट प्रवृत्तीवर सत्याच्या विजयाचे प्रकटीकरण आहे. सध्याच्या काळात धर्म, जात-पात याचा भेदभाव न करता क्षमा आणि बंधुता याच्यापेक्षा शिकण्यासारखा दुसरा धडा नाही. या पवित्र आणि शुभप्रसंगी आम्ही सर्वांनी शांतता, सलोखा आणि बंधुतेच्या आदर्श तत्त्वांचे पालन करूया. या वर्षाचा ईस्टर सण लोकांमध्ये शांतता, आनंद आणि एकता घेऊन येवो."
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील लोकांना विशेषतः ख्रिश्चन बांधवांना ईस्टरच्या शुभप्रसंगी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. "येशू ख्रिस्तांच्या पुनरुत्थान स्मरणोत्सवाचा प्रसंग साजरा करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे वाईट प्रवृत्तीवर सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे."
"गुड फ्रायडे हे मानवजातीमधील मैत्री, बंधुता आणि मानवी मूल्यांचे बंध दृढ करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तांच्या सर्वोच्च आणि निःस्वार्थ बलिदानाचे प्रतीक आहे. येशू ख्रिस्त यांनी उपदेश केलेल्या क्षमा आणि करुणा या शाश्वत आणि मौल्यवान संदेशाचे स्मरण करणे हा आपल्यासाठी एक शुभप्रसंग आहे. ईस्टर सण हा लोकांमध्ये अधिक शांतता, आनंद आणि एकता घेऊन येवो."
"ईस्टर आपल्या सर्वांना इतरांसाठी कार्य करण्यास, आपल्या विवेकाचे पालन करण्याची आठवण करून देतो. इतरांच्या कल्याणासाठी झटण्याची आपण शपथ घेऊया. ईस्टर सण आपण प्रत्येकांना अधिक समृध्दी आणि आनंद आणण्यास प्रेरणा देवो. आपण शांतता आणि आनंदाचे प्रेषित बनुया" असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात शेवटी म्हटले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.