Goa Politics: भाजपमध्ये येण्यास विरोधक उत्सुक! दामू नाईक यांचा गौप्यस्फोट; म्हणाले, 'योग्य वेळी नावे जाहीर करू'

opposition leaders joining BJP in Goa: भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यासाठी विरोधी पक्षांतील अनेक नेते इच्छुक असून, काहींनी केंद्रीय तसेच स्थानिक नेत्यांकडे बोलणी सुरू केली आहेत, असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केला.
opposition leaders joining BJP in Goa
opposition leaders joining BJP in GoaDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

सासष्टी: भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यासाठी विरोधी पक्षांतील अनेक नेते इच्छुक असून, काहींनी केंद्रीय तसेच स्थानिक नेत्यांकडे बोलणी सुरू केली आहेत, असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केला. मात्र, या नेत्यांची नावे जाहीर करण्याचे त्यांनी टाळले. योग्य वेळी ही नावे जाहीर होतील. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांची नावे समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसेल, असेही ते म्हणाले.

पत्रकारांशी बोलताना नाईक यांनी आपण जबाबदार पक्षाचा प्रदेशाध्यक्ष असल्याने जबाबदारीनेच वक्तव्य करीत असल्याचे स्पष्ट केले. काहीजणांचे दाखवण्याचे आणि खाण्याचे दात वेगळे असतात, असे सांगत त्यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केले. राजकारणात अनेक निर्णय अंतिम क्षणी जाहीर होतात. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची नावेही योग्य वेळीच समोर येतील, असे त्यांनी नमूद केले.

opposition leaders joining BJP in Goa
Goa Congress RGP Alliance: जागावाटपाबाबत काँग्रेसकडून उशीर, 'आरजी'च्या बारा मतदारसंघांतील प्रमुखांसोबत बुधवारी बैठक

दरम्यान, राज्यातील वाढती गुन्हेगारी, बालकांवरील अत्याचार आणि लैंगिक शोषणाच्या घटनांबाबत बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत या प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. पोलिसांना आवश्यक आदेश देण्यात आले असून, गुन्हेगारांना २४ तासांत अटक करण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले आहे. पोलिस आपली जबाबदारी चोखपणे पार पाडत असल्याचेही नाईक यांनी सांगितले.

opposition leaders joining BJP in Goa
Goa T20 Squad: अभिनव तेजराणाकडे टी-20 संघाचे नेतृत्व, अर्जुन तेंडुलकर अजूनही अनफिट; स्नेहल कवठणकरला विश्रांती

त्यांना भाजपचे दरवाजे खुले!

भाजपने पक्षात प्रवेश करू इच्छिणाऱ्यांसाठी दरवाजे खुले ठेवले आहेत. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला ३० जागा मिळवून देण्याचे आपले लक्ष्य असल्याचे दामू नाईक यांनी सांगितले. नवीन चेहऱ्यांना उमेदवारी देण्याबाबत पक्षश्रेष्ठी आणि स्थानिक नेते एकत्र बसून विचारविनिमय करतील. पक्षातील कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची इच्छा असणे ही चांगली बाब असून, योग्य व्यासपीठावर चर्चा करून निर्णय घेतले जातील, असेही नाईक यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.