Sadanand Shet Tanawade: कार्यकर्ते हेच पक्षाचे बळ; लोकसभेच्या जागा याच बळावर जिंकणार

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा गोव्यातील दोन्ही जागा निश्चित जिंकेल- तानावडे
Sadanand Shet Tanawade
Sadanand Shet TanawadeDainik Gomantak
Published on
Updated on

Sadanand Shet Tanawade: पक्षात नेते येतील व जातील. अनेकदा नेतेमंडळी पक्ष सोडून जातात, मात्र पक्ष उभा राहतो, तो कार्यकर्त्यांच्या बळावर. भाजपातील मजबूत कार्यकर्त्यांच्या बळावरच, त्यांच्या विश्वासावर आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा गोव्यातील दोन्ही जागा निश्चित जिंकेल, असा आत्मविश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा नवनिर्वाचित राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी व्यक्त केला.

Sadanand Shet Tanawade
Bhoma Highway Protest: बायपास आमका जाय..! महामार्ग रूंदीकरणाविरोधात एकवटले भोमावासीय

राज्यसभेवर बिनविरोध निवडून आल्याबद्दल हळदोणा भाजपा मंडळातर्फे तानावडे यांच्या सन्मानार्थ आयोजिलेल्या कार्यक्रमावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना ते संबोधित करत होते.

माजी आमदार ग्लेन टिकलो, झेडपी सदस्य मनीषा नाईक, माजी नगरसेवक फ्रॅन्की कार्व्हालो, मंडल अध्यक्ष विनय चोपडेकर हे उपस्थित होते.

सध्या पक्षासमोर पुढील ध्येय आहे, ते लोकसभा निवडणूक जिंकण्याचे. गोव्यात ज्याप्रकारे पक्षाचे कार्यकर्ते काम करतात, ते पाहता गोव्यातील उत्तर अणि दक्षिण या दोन्ही जागांवर पक्ष निश्चितपणे विजयी होईल असेही तानावडे म्हणाले.

आपण राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेलो असलो, तरी कार्यकर्ते आणि आपल्यात दरी निर्माण होणार नसल्याची ग्वाही तानावडे यांनी दिली.

Sadanand Shet Tanawade
Goa Congress: भाजपकडून फसव्या जमिनीचे व्यवहार, अधिसूचनेकडे टीसीपीचे दुर्लक्ष

कार्यकर्त्यांमुळे यश!

सलग तिसऱ्यांदा भाजपा सरकार सत्तेवर येण्यास मजबूत अशा कार्यकर्त्यांच्या बळावर शक्य झाले, असे तानावडे म्हणाले.

निवडणुकीत भाजपला लाभलेले यश प्रदेशाध्यक्ष या नात्याने आपल्याला दिले जात असले तरी निवडणुकीदरम्यान पक्ष सोडून गेलेल्यांना पक्षात कायम ठेवण्यात आलेले अपयश हे सुद्धा आपलेच होते.

मात्र कार्यकर्ते एकसंध राहिल्याने भाजपला यश नक्कीच प्राप्त होणार याचा विश्वास आम्हाला होता, असेही तानावडे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com