Rohan Khaunte: महासागर इंटरप्रिटेशन सेंटरची स्थापना होणार; पर्यटन मंत्र्यांची हमी

Goa: गोव्यातील पर्यटन विकास लक्षात घेऊन गोव्यात महासागर व्याख्या केंद्र, ओसेनेरियम स्थापन करण्याचा संकल्प घेतला आहे.
Rohan Khaunte
Rohan KhaunteDainik Gomantak
Published on
Updated on

Vasco: भारत सरकारच्या भारतीय मात्सिकी सर्वेक्षण मत्स्यपालन विभाग मुरगाव क्षेत्र विभागातर्फे गोवा सरकारचे पर्यटन मंत्री रोहन खवंटे यांना महासागर इंटरप्रिटेशन सेंटरची स्थापना करण्यास जमिनीसाठी विनंती करण्यास निवेदन सादर करण्यात आले.

भारतीय मात्सिकी सर्वेक्षण भारत सरकार, मत्स्य व्यवसाय विभाग, मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालय सरकारच्या अंतर्गत, भारतीय मत्स्य सर्वेक्षण दिल्लीत एम एफ व्ही सागरीका आणि एम एफ व्ही यली फिन या दोन सर्वेक्षण जहाजे आहेत. भारताच्या मध्य पश्चिम किनारपट्टीवर नियमित मत्स्यपालन सर्वेक्षण करतात आणि सर्वेक्षणाचे निकाल मोठ्याच्या गोव्याच्या किनारपट्टीवरील मच्छीमार आणि मत्स्य उद्योजकांना त्यांच्या उत्पन्नसाठी प्रसारित करतात.

Rohan Khaunte
Goa Ration: ...तोपर्यंत धान्य कोटा उचलणार नाही; वास्कोत नागरिक आक्रमक

दरम्यान, भारतीय मात्सिकी सर्वेक्षणाने गोव्यात 90 मीटर 'टनेल एक्वेरियमसह आर्ट ओशन इंटरप्रिटेशन सेंटर' करण्याचा प्रस्ताव पर्यटन मंत्री रोहन खवंटे यांच्याकडे मांडला आहे. गोवा सरकार हे पर्यटनाचे आकर्षण केंद्र आहे आणि एका वर्षात अंदाजे 17 लाख पर्यटकांना आकर्षित करते.

गोव्यातील मत्स्यपालन पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि विद्यार्थी संशोधक आणि नागरिक शास्त्रज्ञाना सागरी प्राणी आणि त्याचे वर्तन, अनुसूचित सागरी प्राण्याचे वर्तन, जागरूकता आणि संवर्धन इत्यादींचा अभ्यास करण्यास सक्षम करण्यासाठी हा प्रकल्प घेण्यात आला आहे. गोव्यातील पर्यटन विकास लक्षात घेऊन गोव्यात महासागर व्याख्या केंद्र, ओसेनेरियम स्थापन करण्याचा संकल्प घेतला आहे

Rohan Khaunte
Goa Accident: अनंत साळकर यांच्यावर 'गोमेकॉत' उपचार सुरुच

समुद्राच्या पाण्याच्या आघाडीची किमान 3 एकर जमीन मुरगाव तालुक्यात किंवा आसपासच्या भागात आणि फक्त ओसेनेरियम इंटरप्राईजेस सेंटरच्या स्थापनेसाठी मोफत जमीन देण्याची मागणी, भारत सरकारचा मत्स्य व्यवसाय विभाग, मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालय सरकारच्या अंतर्गत भारतीय मात्सिकी सर्वेक्षण मुरगांव विभागातर्फे करण्यात आली आले आहे.

भारतीय मात्सिकी सर्वेक्षण मुरगाव बोगदा विभागाचे झोनल संचालक डॉ. एस रामचंद्रन, शास्त्रज्ञ राजू नागपुरे, मनोज वळवईकर, नशाद एम यांच्या उपस्थितीत पर्यटन मंत्री रोहन खवंटे यांच्यासमोर पर्यटन विभागात बैठक संपन्न झाली व निवेदन सादर केले. यावेळी पर्यटन संचालक आमदार गणेश गावकर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com