Dhirio in Colva: सुरावलीत पुन्हा धीरियोचा थरार, पोलिसांकडून FIR दाखल; Viral Video वरुन चर्चा..

Dhirio Colva Video: कोलवा पोलिस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या सुरावली येथील शेतात बैलांच्या धीरियो आयोजित केल्याचे वृत्त असून या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

मडगाव: कोलवा पोलिस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या सुरावली येथील शेतात बैलांच्या धीरियो आयोजित केल्याचे वृत्त असून या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. मात्र यासंदर्भात कोलवा पोलिस पोलिसांना विचारले असता, आम्हाला याबाबत काही माहिती नाही, आमच्यापर्यंत अजून ही गोष्ट आलेली नाही, असे सांगण्यात आले.मिळाल्या माहितीनुसार सुरावली येथे उघड्या शेतात या धीरियो झाल्या. यावेळी शेकडो लोक जमले होते.

व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, काल असाच एक धीरियोंचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या धीरियो कोलव्यात झाल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते. यामुळे कोलवा पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद केला होता. मात्र हा व्हिडिओ मांद्रे येथे झालेल्या धीरियोंचा असल्याचे कोलवा पोलिसांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Lucknow Scooty Stunt Viral Video
Colva Lift Accident Death
Sewage Water In Colva Creek
Colva Drain Pollution
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com