Benaulim Dhirio: बाणावलीत 2 दिवस खुलेआम धीरयोचा थरार! बघ्यांची तोबा गर्दी; पोलिस मात्र अनभिज्ञ

Dhirio In Goa: बाणावली येथील मारिया हॉल मागे असलेल्या शेतात सायको आणि चांद या दोन रेड्यांमध्ये झुंज लावली होती. ही झुंज पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.
Dhirio In Goa
Dhirio In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: न्यायालयाने बंदी घालूनही बाणावली भागात धीरयोंचे आयोजन सुरूच असून पोलिसांच्या नाकावर टिच्चून सलग दोन दिवस रेड्यांच्या झुंजींचे आयोजन केले होते. यासंदर्भात कोलवा पोलिसांशी संपर्क साधला असता, आम्हाला याबद्दल काहीच माहिती नाही अशी साळसूद भूमिका त्यांनी घेतली.

बाणावली येथील मारिया हॉल मागे असलेल्या शेतात सायको आणि चांद या दोन रेड्यांमध्ये झुंज लावली होती. ही झुंज पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. झालेल्या झुंजीत ‘चांद’ हा रेडा जिंकला, अशी माहिती मिळाली.

Dhirio In Goa
Majorda Dhirio Case: धीरयो मृत्यूप्रकरणी 2 पोलिस गोत्यात, अमेरिकेतील दोघांविरुद्ध लुकआऊट नोटीस; संशयित अजून फरार

खुलेआम शेतात धीरयो होत असून तिथे हजारो लोक जमत असतानाही पोलिसांनी, ‘आम्हाला काहीच माहिती नाही’, असे उत्तर त्यांच्याकडून मिळाले. पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांना विचारले असता, ‘चौकशी करून माहिती देतो’, असे त्यांनी सांगितले.

Dhirio In Goa
Dhirio in Colva: सुरावलीत पुन्हा धीरियोचा थरार, पोलिसांकडून FIR दाखल; Viral Video वरुन चर्चा..

अधिकारी येताच बघे पसार

सोमवारीही मारिया हॉलजवळ अशाच धीरयोचे आयोजन केले होते. धीरयो पाहण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती. याची माहिती जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना मिळाल्यावर काही अधिकारी गाडी घेऊन घटनास्थळी दाखल झाल्यावर बघ्यांनी तिथून काढता पाय घेतला आणि झुंजीसाठी आणलेल्या रेड्यांनाही लपविण्यात आले. काही वेळाने हे अधिकारी वाहन घेऊन निघून गेल्यावर पुन्हा लोक जमले आणि धीरयो लावल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com