Beggars Outbreak In Goa सासष्टी शहर तसेच किनारी भागात भिकाऱ्यांची संख्या वाढली आहे, या समस्येवर कशा तऱ्हेने तोडगा काढावा,अशी चिंता प्रशासनाला लागून आहे.
या पार्श्वभूमीवर मडगावात अतिरिक्त जिल्हाधिकारी दीपक देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कचेरीत झालेल्या बैठकीत भिकाऱ्यांच्या जटील समस्येबद्दलच्या उपाययोजनांवर विचारविनिमय करण्यात आला.
बैठकीत पोलिस खाते, समाज कल्याण खाते, मडगाव नगरपालिकेचे प्रतिनिधी तसेच ‘गोवाकॅन’चे निमंत्रक रोलांड मार्टीन्स उपस्थित होते.
ट्रॅफिक सिग्नलजवळ लहान मुले व बेशुध्दावस्थेतील लहान मुलांना खांद्यावर घेऊन भीक मागणाऱ्या महिलांवर ताबडतोब कारवाई करण्याचा आदेश अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना पोलिसांना दिला आहे.
तसेच भिकाऱ्यांचा बिमोड करण्यासाठी काय उपाययोजना आवश्यक आहे, याचा विचार करण्यासाठी सल्लागार समिती स्थापन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. ही समिती समाज कल्याण खाते किंवा महिला व बाल विकास खात्याच्या अधिकार कक्षेत असावी.
भिकारी किती, भीक मागण्याची ठिकाणे शोधा !
दक्षिण गोव्यात किती भिकारी आहेत, किती भिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. याची आंकडेवारी (डेटा) तयार करण्याची जबाबदारी पोलिसांवर सोपविण्यात आली असून पुढील बैठकीत सादर करण्यास सांगितले आहे.
जिथे जिथे भिकारी भीक मागतात, ती ठिकाणे शोधून काढण्याची जबाबदारी नगरपालिकेवर टाकण्यात आली आहे. दोन्ही जिल्ह्यांमध्ये भिकारी निवास सुरू करण्याबद्दलही बैठकीत चर्चा झाली.
भिकारी निवास ही सुविधा एकाद्या भिकाऱ्याला कायमस्वरुपी तिथेच राहण्यासाठी नसून, एखाद्या भिकाऱ्याची रवानगी त्याच्या राज्यात होत नाही, तोपर्यंत त्याला तिथे ठेवण्याची सोय असेल. जर सरकारकडे निवास चालविण्यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद नसेल तर एखाद्या एजन्सीची नियुक्ती केली जाऊ शकते. - रोलांड मार्टीन्स, निमंत्रक ‘गोवा कॅन’
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.