Goa Canacona: काणकोण मासळी मार्केटची दुरवस्था तर सांगेतील मासळी विक्री प्रकरण वादात!

मत्स्य विक्रेत्या महिलांनी दिलाय 'हा' इशारा
Fish sale dispute
Fish sale disputeDainik Gomantak
Published on
Updated on

Fish sale dispute काणकोण पालिकेचे चावडी येथे असलेले मासळी मार्केटमध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. याठिकाणी मासेविक्री करणाऱ्या महिलांकरता असलेल्या स्वच्छतागृहाचे दारे मोडलेली आहेत. या स्वच्छतागृहासमोर चिकन सेंटर आहेत. वातावरण गलिच्छ बनलेले असून मार्केटची देखभाल करण्यास पालिका प्रशासन अपयशी ठरले आहे,असा ठपका मासे विक्रेत्यांनी ठेवला आहे.

संतोष तुबकी यांच्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात या मार्केटची सफाई करण्यात आली होती, त्यानतर याठिकाणी दुर्लक्ष झाल्याने काही मासेविक्री करणाऱ्या महिला या ठिकाणी यायलाही तयार नाहीत.

नियमित मासेविक्री करणाऱ्या महिलांसाठी जागा ठरवून दिलेल्या आहेत. या मार्केट मध्ये १५० महिला बसून मासेविक्री करू शकतात. ठरलेल्या जागेवर अन्य कुणी बसून मासेविक्री केली तर महिलांनी आक्षेप घेतला जातो.

मात्र, कुणालाही व्यवसाय करायला हरकत घेतलेली नाही. यापूर्वी तळपण, पोळें, गालजीबाग, पाळोळें, आगोंद आदी भागातील महिला येथे बसून व्यवसाय करत असत. याठिकाणी मासेविक्री करणाऱ्या महिला सध्या फिरकत नाहीत.

त्या ऐवजी चार-रस्ता,नगर्से येथील उड्डाणपुलाखाली, चावडी येथील चर्च समोरील जागा, शेळेर व अन्य ठिकाणी रस्त्याकाठी उघड्यावर मासेविक्री याचाच परिणाम आहे, असे मासे विक्री करणा-या महिलांनी सांगितले.

Fish sale dispute
ED Takes Over Probe Into Salgaocars: चार हजार कोटींचे कथित विदेशी चलन उल्लंघन; गोव्यातील साळगावकर कुटुंबाची चौकशी आता ED करणार

चावडी येथील मासळी मार्केट समोर बसून करण्यात येत असलेली मासेविक्री नगराध्यक्षांच्या सूचनेवरून बंद करण्यात आली. काही महिला आज याच मार्केटमध्येच बसून व्यवसाय करत आहेत.

मात्र ग्राहक याठिकाणी येत नसल्याने त्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. ग्राहक नसल्यामुळे विकत घेतलेले मासे संध्याकाळी घरी जाण्यापूर्वी जमिनीत पुरावे लागतात, असे मासळी मार्केट मध्ये बसून मासेविक्री करणाऱ्या महिलांकडून सांगण्यात आले.

Fish sale dispute
Goa Assembly 2023: राज्यातील 'निकृष्ट रस्ते, वाहतूक कोंडी' प्रश्न जैसे थे; सरकारच्या 'त्या' केवळ घोषणाच!- बोरकर

...तर उड्डाणपुलाच्या दुसऱ्या बाजूला बसू !

रस्त्यावरील उघड्यावर धोक्याच्या ठिकाणी बसून करत असलेली मासेविक्री पालिकेने बंद न केल्यास नगर्से येथील उड्डाणपुलाखाली दुसऱ्या बाजूला बसून मासेविक्री करू, असा इशारा या नाराज झालेल्या महिलांकडून देण्यात आला आहे.

तत्पूर्वी मासेविक्री करणा-या महिलांचे एक शिष्टमंडळ नगराध्यक्ष रमाकांत नाईक गावकर व मुख्याधिकारी यांची भेट घेणार असल्याचे या महिलांकडून सांगण्यात आले.

सांगेत रस्त्यालगतची मासळी विक्री वादात!

मासेमारीला सुरुवात होताच राज्यात रस्त्यालगत मोठया प्रमाणात खुले आम मासळी विक्री सुरू केली आहे. सांगे बाजारात रस्त्याच्या बाजूला बसून मोठया प्रमाणात मासळी विक्री केली जात आहे, त्यामुळे वाहतुकीला अडसर होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे, तर स्थानिक मासळी विक्रेत्यांनी जोरदार हरकत घेतली.

मासळी उपलब्ध झाल्यामुळे लोकही भर रस्त्यावर दुचाकी पार्क करून मासळी खरेदी करू लागल्याने मुख्य रस्त्यावर अपघाताची शक्यता नाकारता येत नसल्याची भीती नागरिक व्यग्र करू लागले.

या संधर्भात स्थानिक मासळी विक्रेते आग्नेल फर्नांडिस म्हणाले की, रस्त्यावर मासळी विकणाऱ्यावर सांगे पालिकेने बंदी घालावी, अशी अनेकदा मागणी करूनही अंतर्गत रस्त्यालगतची मासळी विक्री थांबलेली नसताना आता थेट मुख्य रस्त्यालगत बसून मासळी विक्री केली जात आहे.

परिणामी स्थानिक मासळी विक्रेते मासळी मार्केट मध्ये बसून ग्राहकांची प्रतीक्षा करतात. सांगे सीओ गौरेश गावकर यांनी तक्रारीची तात्काळ दखल घेऊन पालिका पर्यवेक्षक लुईस फर्नांडिस यांना त्वरित मासळी विक्री बंद करण्याची सूचना केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com