Chhatrapati Shivaji Maharaj
Chhatrapati Shivaji MaharajDainik Gomantak

शिवाजी महाराज आमचे दैवतच; टीका करणाऱ्यांना त्यांची जागा आपोआप दिसेल! परेरांच्या विधानावर ढवळीकर कडाडले

फादर बोलमॅक्स यांच्या विधानाचा अनेक राजकीय नेत्यांनीही विरोध केला आहे
Published on

'छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदूंचे हिरो आहेत; पण देव नाही, त्यांना तुम्ही देव मानू नका', असे वक्तव्य फादर बोलमॅक्स परेरा यांनी एसएफसी चर्च चिखली येथे बोलताना केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या असून यावरून आता विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. फादर बोलमॅक्स यांच्या विधानाचा अनेक राजकीय नेत्यांनीही विरोध केला असून असे बोलणे अतिशय चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj
'छत्रपती शिवाजी महाराज हिरो पण देव नाही', फादर बोलमॅक्स परेरा यांचे वक्तव्य; काणकोणात तक्रार दाखल

छत्रपती शिवाजी महाराज आमचे देवच! : सुदिन ढवळीकर

वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी फादर परेरा यांच्या विधानाचा कडाडून निषेध केला आहे. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी देव आहेत. त्यांच्याविरोधात जर कुणी वाईट बोलत असेल तर आम्हाला काहीच फरक पडत नाही; कारण ते आमचे दैवत आहेत. पण त्यांच्याबद्दल वाईट विधान करणाऱ्यांना त्यांना त्यांची जागा आपोआप दिसेल.

शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करत सुराज्य निर्माण केले. आमच्या संस्कृतीबद्दल बोलण्यापेक्षा आमच्या संस्कृतीतील चांगल्या गोष्टी लोकांनी घ्याव्यात.

कोणाच्याही धार्मिक भावना दुखावू नयेत : माविन गुदिन्हो

यावर मंत्री माविन गुदिन्हो यांनीही आक्षेप दर्शवला आहे. ते म्हणाले की, प्रत्येकाने सार्वजनिक ठिकाणी बोलताना भान ठेवणे आवश्यक आहे. विशेषत: चर्चमधून बोलताना अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे. धार्मिक रेषा ओलांडून कोणाच्याही धार्मिक भावना दुखावू नयेत याची आपण काळजी घ्यावी. जे काही घडले ते खरोखर वाईट आहे.

काय म्हणाले होते फादर बोलमॅक्स परेरा?

काही दिवसांपूर्वी कळंगुटमध्ये एक घटना घडली. येथील पंचायतीचा सरपंच ख्रिचन असल्याने मोठा वाद झाला. छत्रपती शिवाजी देव झालेत, पण शिवाजी महाराज देव नाहीत. शिवाजी राष्ट्रीय हिरो आपण त्यांना मान दिला पाहिजे त्यांचा आदर केला पाहिजे.

या राज्यासाठी त्यांनी केलं त्याचा आपण आदर केला पाहिजे. ते हिरो आहेत पण देव नाहीत. पण हिंदू लोकांनी त्यांना देव केलं आहे. असे वक्तव्य फादर बोलमॅक्स परेरा यांनी केले होते.

याप्रकरणी शिवप्रेमींनी फादर परेरा यांच्याविरोधात काणकोण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com