Goa Beach: मान्सूनच्या आगमनामुळे किनाऱ्यांवर लगबग! शॅक व्यावसायिक, मच्छीमारांची आवराआवर; ट्रॉलरना चक्रिवादळाची धास्ती

Goa Beach News: वेळेपूर्वीच आलेल्या पावसामुळे शॅक बंद करावे लागतात, असे बाणावली येथील एका शॅकमालकाने सांगितले. ट्रॉलरवर सुमारे ८ हजार मजूर काम करतात.
Goa Beach Shacks
Goa Beach ShacksCanva
Published on
Updated on

सासष्टी: राज्यात एक जूनपासून मच्छीमारी बंदी लागू होत आहे. या दिवसांत राज्यातील किनारपट्टीवरील शॅकसुद्धा बंद होतात; पण गेल्या पाच-सहा दिवसांपासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे मच्छीमारांनी खोल समुद्रात जायचे यापूर्वीच बंद केले आहे. शॅकमालकांनी किनाऱ्यावरील बांधकामे हटविण्यास सुरुवात केली आहे.

अरेबियन समुद्रात सध्या वादळी वातावरण असल्याने सुुमारे १५०० ट्रॉलरमालकांनी आपल्या बोटी समुद्रात पाठविणे बंद केले आहे. त्याचप्रमाणे सरकारी मान्यताप्राप्त अंदाजे ३५० शॅकमालकांनी ३१ मेपर्यंत न थांबता आधीच शॅक बंद केले आहेत.

Goa Beach Shacks
Goa Beach Shacks: गोवा पर्यटन विभागाची मोठी कारवाई! 23 बेकायदेशीर शॅक्स बंद करण्याचे आदेश; 6 व्यावसायिक बिगर गोमंतकीय

समुद्रात जाणे धोकादायक

डेनिस डिकॉस्तानामक ट्रॉलरमालकाने सांगितले, की या वातावरणात ट्रॉलर समुद्रात पाठविणे धोकादायक बनले आहे. पर्यटकसुद्धा फारच कमी झाले आहेत. स्थानिकांनी तर घरातच राहणे पसंत केले आहे.

यंदा आम्हाला समाधानकारक फायदा झाला. कारण शॅकसुद्धा योग्य वेळी सुरू करण्यात आले. परंतु आणखी सहा सात दिवस मिळाले असते तर चांगले झाले असते. पण निसर्गापुढे शहाणपण चालत नाही.

Goa Beach Shacks
Goa Beach Shack: सहा शॅक्ससाठी कारवाई नको! ‘परवाने रद्द’ निर्णयाचा पुनर्विचार करा; संघटनेची मागणी

मजुरांनी धरला घरचा रस्ता

यावर्षी सर्वसामान्य वेळेपूर्वीच आलेल्या पावसामुळे शॅक बंद करावे लागतात, असे बाणावली येथील एका शॅकमालकाने सांगितले. ट्रॉलरवर सुमारे ८ हजार मजूर काम करतात. दरवर्षी ते १ जूननंतर घरी जातात; पण यंदा मजुरांनी यापूर्वीच घरचा रस्ता धरला आहे. काहीजणांनी ट्रॉलरवरील जाळी व इतर सामग्री एकत्र करून ठेवण्यास सुरुवात केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com