Goa Beach: बुडणाऱ्या 13 पर्यटकांना दृष्टी मरीनच्या जीवरक्षकांकडून जीवदान, 2 परदेशी नागरिकांचा समावेश

दुधसागर धबधब्याजवळ एकाला वाचवले
Drishti Lifeguard Goa
Drishti Lifeguard GoaDainik Gomantak

Drishti Marine Lifeguards Saved 13 life: गोव्यातील विविध समुद्रकिनारे आणि इतर पाणवठ्यांवर बुडण्यापासून 13 पर्यटकांना वाचवण्याची कामगिरी दृष्टी मरीन या जीवरक्षक एजन्सीने केली आहे. यात दोन परदेशी नागरिकांचा समावेश असून गेल्या आठवड्यातील ही आकडेवारी आहे.

गोव्यातील किनारपट्टीवर व्यावसायिक जीवनरक्षक सेवा देण्याचे काम दृष्टी लाईफगार्ड्स ही खासगी संस्था करते.

दृष्टी मरीन लाइफसेव्हिंगच्या प्रवक्त्याने सांगितले, की गुजरातमधील 34 वर्षीय पर्यटक दूधसागर धबधब्यावर खडकावरून घसरला आणि खाली पाण्यात पडला.

तथापि, येथे ड्युटीवर असलेला दृष्टी मरीन कंपनीचा एक जीवरक्षक त्याच्या मदतीसाठी धावला आणि बचाव नळीच्या मदतीने त्याने बुडणाऱ्या पर्यटकाला पुन्हा किनाऱ्यावर आणले.

दरम्यान, उत्तर गोव्यातील मोरजी येथे मुंबईच्या तिघांना वाचवण्यात आले. त्यांची वये 35, 21 वर्षे आणि 6 वर्षे अशी होती.

Drishti Lifeguard Goa
Goa Tourism: गूगलवर 2023 मध्ये सर्वाधिक सर्च झालेल्या टॉप 10 पर्यटन स्थळांमध्ये गोवा 'या' नंबरवर

कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर 26 ते 31 वर्षे वयोगटातील कर्नाटक आणि महाराष्ट्रातील तीन पुरुष बुडत होते. त्यांनाही जीवरक्षकांनी वाचवले. पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले होते. त्यांना पोहता येत नव्हते.

पण जीवरक्षकांच्या एका गटाने तातडीने त्यांच्या बचावासाठी धाव घेत त्यांना सुरक्षित ठिकाणी आणले.

याशिवाय इंदूरमधील दोन पुरुष आणि 24 वर्षीय रशियन महिलेलाही समुद्राच्या पाण्याच्या प्रवाहात अडकली होती. त्यांना जेट स्कीच्या सहाय्याने वाचवण्यात आले. हरमल किनाऱ्यावर ही घटना घडली.

Drishti Lifeguard Goa
Home Stay Policy अंतर्गत 2 लाख रूपये अनुदानासह स्वयंसहायता गटासाठी मदत करणार गोवा सरकार

आणखी एका घटनेत, उत्तर गोव्यातील मांद्रे समुद्रकिनाऱ्यावर एक बचाव मोहीम राबवण्यात आली. यात इटलीतील 10 वर्षांच्या अल्पवयीन मुलाला वाचवण्यात आले.

हा मुलगा एका जोरदार लाटेत वाहून जाताना नजरेस पडला. पण, दोन जीवरक्षकांनी त्याला बचाव नळीच्या मदतीने त्वरीत सुरक्षित स्थळी आणले.

तसेच राजस्थानमधील 25 वर्षीय महिला स्वीट लेक तलावात बुडत असताना तिला वाचवण्यात आले आणि मुंबईतील 34 वर्षीय पुरुष कळंगुट किनाऱ्यावर बुडत असताना त्यालाही वाचवण्यात यश आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com