Goa Beach: हरमल, बागा, कळंगुट, मांद्रे बीचवर बुडणाऱ्या 13 पर्यटकांना जीवदान; दृष्टी मरिनची कामगिरी

छत्तीसगड, महाराष्ट्र, कर्नाटकातील पर्यटकांचा समावेश
Goa Beach
Goa BeachDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Beach: गोव्याच्या किनार्‍यावर या वीकेंडला 13 पर्यटकांना बुडताना वाचवण्यात आले. गोव्यतील किनाऱ्यावर तैनात असलेल्या दृष्टी मरिनच्या स्वयंसेवकांनी ही कामगिरी केली आहे. सोमवारी गुरूनानक जयंतीनिमित्त सुट्टी असल्याने ही सोमवारपर्यंतची आकडेवारी आहे.

समुद्र किनाऱ्यांवर लोकांच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या दृष्टी लाइफसेव्हिंग या एजन्सीच्या प्रवक्त्याने सांगितले की, साधारण २५ वय असलेले चार पर्यटक छत्तीसगडमधील बिलासपूरहून आले होते. हरमल येथे त्यांना किनाऱ्यावर पाण्याचा अंदाज आला नाही.

त्यामुळे ते बुडू लागले होते. पण, एजन्सीचे सागरी जीवरक्षक अमित कोळंबकर आणि उमेश फडते यांनी जेट स्कीच्या सहाय्याने त्यांच्यापर्यंत पोहचत त्यांना वाचवले.

Goa Beach
IFFI 2023: मी मुलीसोबत आलोय, कॉलगर्ल सोबत नाही; 'इफ्फी'मध्ये अभिनेते रणजीत यांनी सांगितला किस्सा...

हरमल समुद्रकिनाऱ्यावरच आणखी अशा दोन घटना घडल्या. त्यात हैदराबादच्या एका 25 युवकाला आणि राजस्थानचा रहिवासी असलेल्या 23 वर्षीय युवकाला जीवरक्षकांनी वाचवले.

प्रितेश कुबल, चेतन बांदेकर आणि नवनाथ घाटवाल यांनी या दोघांसाठी रेस्क्यू बोर्ड, रेस्क्यू ट्यूब आणि जेट स्की घेऊन धाव घेतली.

याशिवाय बागा समुद्रकिनाऱ्यावर, कर्नाटक आणि पुणे येथील 22 ते 26 वर्षे वयोगटातील पाच पुरुषांना जीवरक्षक फोंडू गावस, उमेश मडकईकर, दिवाकर देसाई, साईनाथ गावस आणि मंथा किनळकर यांनी बचाव कार्य राबवत वाचवले.

या ग्रुपमधील पाच एक जण बुडू लागला होता. इतर चार मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पाचही जण पाण्याच्या करंटमध्ये अडकले होते. पण जीवरक्षकांनी पाचही जणांना सुखरूप किनाऱ्यावर आणले. त्यानंतर त्यांना प्रथमोपचार देण्यात आले.

Goa Beach
Goa Unpaid Debt: गोव्यावर 31758 कोटी रूपये कर्ज; 20 वर्षात थकबाकीत 618 टक्के वाढ

याशिवाय कळंगुट आणि मांद्रे येथील बीचवर एका 36 वर्षीय रशियन महिलेला आणि बेंगळुरूच्या एका 21 वर्षीय पुरुषाला जीवदान दिले. तोदेखील समुद्राच्या पाण्याच्या अंतःप्रवाहात अडकला होता.

यावेळी जीवरक्षक रोहित हिरनायक आणि दर्पण रेवांका यांनी त्यांची सुटका केली.

दरम्यान, दृष्टी मरीन लाइफसेव्हर्सने कळंगुट आणि बागा बीचवर दोन बेपत्ता मुले, मध्य प्रदेशातील चार वर्षांची मुलगी आणि मुंबईतील एक हरवलेल्या मुलाचा शोध घेत त्यांना त्यांच्या पालकापर्यंत सुखरूप पोहचवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com