Goa Liquor Seized in Karnataka: राज्यात अवैध मद्य वाहतूक रोखण्यासाठी सरकार, पोलीस खाते तसेच अबकारी विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत असतात. मात्र अनेकजण विविध मार्ग काढून गोव्यातून मद्य तस्करी करण्याचे धाडस करतात. गोव्यातून कर्नाटकात अशीच वाहतूक केल्याप्रकरणी कणकुंबी चेकपोस्टवर कारवाई करण्यात आली. तस्करी केलेली 27 लाखांची दारू खानापूर अबकारी खात्याने ताब्यात घेतली आहे.
माहितीनुसार, गोव्यातून गुजरातला जाणाऱ्या ट्रकमध्ये तब्बल 27.52 लाखांची गोवा बनावटीची दारू तस्करी करून नेत असल्याची माहिती अबकारी खात्याला मिळाली होती. याप्रकरणी खानापूर अबकारी खात्याने सापळा रचत कणकुंबी चेकपोस्टवर या ट्रकला अडवून त्यातील मद्य ताब्यात घेतले.
याप्रकरणात 27, 52, 398 लाखांची दारू आणि अंदाजे 25 लाखांचे वाहन (ट्रक) असा एकूण 52, 52, 398 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ट्रकमधून मद्य वाहतूक करण्यासाठी एक अनोखीच शक्कल वापरली असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. ट्रकच्या मागील हौदयात कप्पे तयार करण्यात आले असून त्यामध्ये दारूच्या बॉटल भरून ठेवण्यात आल्या होत्या.
कुणाच्याही सहज लक्षात येऊ नये यासाठी ते कप्पे वेल्डिंग करून बंद करण्यात आले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांनी खानापूरच्या अबकारी खात्यात ट्रक नेला आणि जेसीबीच्या सहाय्याने ट्रकचे मागील कप्पे उघडून बॉटल बाहेर काढल्या. दरम्यान, ट्रकचालक आणि क्लीनरला अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे असून पुढील तपास सुरू आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.