Goa Kala Academy: शिरगावकर स्मृती बालकलाकार विभागीय स्पर्धा 19 पासून; राज्यभरातील 36 पथके, चार केंद्रांवर होणार सादरीकरण

Goa Balkalakar Bhajani Competition: कला अकादमी गोवातर्फे आयोजित पं. मनोहरबुवा शिरगांवकर स्मृती विभागीय स्तरावरील बालकलाकारांची स्पर्धा १९ ते २३ जुलैदरम्यान होणार आहे.
Goa Balkalakar Bhajani Competition
Goa Kala AcademyDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कला अकादमी गोवातर्फे आयोजित पं. मनोहरबुवा शिरगांवकर स्मृती विभागीय स्तरावरील बालकलाकारांची स्पर्धा १९ ते २३ जुलैदरम्यान होणार आहे. यंदा बाल विभागात एकूण ३६ पथके सहभागी झाली असून, चार केंद्रांवर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार, १९ जुलै रोजी पोडवाळ, खोर्जुवे-बार्देश येथील श्री सातेरी पंचायतन देवस्थान येथे होणाऱ्या केंद्र क्र. १ मध्ये बाल भवन केंद्र, म्हापसा-बार्देश; श्री शांतादुर्गा जांभळेश्वर सांस्कृतिक संस्था, कळंगुट-बार्देश; श्री महादेव कलामंच, पालये-पेडणे; श्री राम सेवा संघ बाल भजनी मंडळ, मयडे-बार्देश; श्री सातेरी बाल भजनी मंडळ, मयडे-बार्देश; श्री रवळनाथ बाल भजनी मंडळ, मयडे-बार्देश; स्वर गंधार बाल भजनी मंडळ, नास्नोडा-बार्देश; श्री साई दिगंबर बाल भजनी मंडळ, आसगाव-बार्देश आणि श्री दत्तात्रय बाल भजनी मंडळ, तळर्ण-पेडणे ही पथके सहभागी होणार आहेत.

Goa Balkalakar Bhajani Competition
Kala Academy: कला अकादमीची तज्ञांकडून होणार तपासणी; समितीचा अहवाल आल्यानंतरच बंदबाबतचा निर्णय

सोमवार, २० जुलै रोजी खोडये, पिसुर्ले-सत्तरी येथील श्री देवी केळबाय देवस्थान येथे होणाऱ्या केंद्र क्र. २ मध्ये श्री कुलदेवी म्हाळसा बाल भजनी मंडळ, पर्ये-सत्तरी; श्री सातेरी रवळनाथ बाल भजनी मंडळ, गावठण-साखळी; बाल भवन केंद्र, कारापूर-साखळी; डॉ. के. बी. हेडगेवार हायस्कूल, वाळपई-सत्तरी; श्री शांतादुर्गा हायस्कूल बाल भजनी मंडळ, डिचोली; स्वरदीप बाल भजनी मंडळ, आमोणा-डिचोली; सरकारी हायस्कूल, तारमाथा भिले, सुर्ला-डिचोली; श्री महालक्ष्मी बाल भजनी मंडळ, तिवरे, माशेल-फोंडा आणि स्वर साधना बाल भजनी कलाकार, सावर्डे-सत्तरी ही पथके सहभागी होणार आहेत.

बुधवार, २२ जुलै रोजी बांदोडा-फोंडा येथील श्री रामपुरुष गौडेपुरुष देवस्थान मंडप येथे होणाऱ्या केंद्र क्र. ३ मध्ये श्री साईमय बाल भजनी मंडळ, शिरोडा-फोंडा; श्री सातेरी प्रासादिक संगीत संस्था, बेतोडा-फोंडा; श्री गणेश शांतादुर्गा बाल भजनी मंडळ, म्हाळशे, कुर्टी-फोंडा; श्री शांतादुर्गा भजनी मंडळ, बांदोडा-फोंडा; स्वर साधना कला व सांस्कृतिक संस्था, करंजाळ, मडकई-फोंडा; श्री शांतादुर्गा बाल कलाकार भजनी मंडळ, खांडेपार-फोंडा; श्री बाल गणेश भजनी मंडळ, कुंडई-फोंडा; श्री निवलेश्वर बाल भजनी मंडळ, आक्सण, मडकई-फोंडा आणि पंचशील इंग्लिश स्कूल, बोरी-फोंडा ही पथके सहभागी होणार आहेत.

Goa Balkalakar Bhajani Competition
Goa Kala Academy: कला अकादमी पुन्‍हा 1 ऑगस्टपासून बंद, IIT मद्रासचा धक्कादायक रिपोर्ट; नूतनीकरण कामाचे निघाले वाभाडे

गुरुवार, २३ जुलै रोजी बामणभाट, मेरशी-तिसवाडी येथील श्री सत्यनारायण देवस्थान येथे होणाऱ्या केंद्र क्र. ४ मध्ये श्री ब्राह्मण कला संघ, दिवाडी-तिसवाडी; स्वर गंधा बाल भजनी मंडळ, चिंबल, शिरेंत-तिसवाडी; श्रीकृष्ण नागझरकर बाल भजनी मंडळ, भोमा-फोंडा; श्री मल्लिकार्जुन बाल भजनी मंडळ, भोमा-फोंडा; श्री सतीदेवी बाल भजनी मंडळ, भोमा-फोंडा; श्री साईनाथ बाल भजनी मंडळ, भोमा-फोंडा; श्री दामोदर विद्यालय, लोलये-काणकोण; बाल भवन केंद्र, मडगाव आणि गुरुकुल हायस्कूल, काजूमळ, खोला-काणकोण ही पथके सहभागी होणार आहेत.

स्पर्धकांना आवाहन

स्पर्धेला दुपारी ठीक २.३० वाजता सुरुवात होणार असून, प्रत्येक पथकाने आपले सत्र सुरू होण्याच्या अर्धा तास अगोदर सर्व कलाकारांसह स्पर्धास्थळी उपस्थित राहावे. स्पर्धेचा अनुक्रम दुपारी २ वाजता चिठ्ठ्या टाकून ठरविण्यात येईल आणि तो सर्वांवर बंधनकारक राहील. सादरीकरणाचा अनुक्रम न पाळणाऱ्या पथकांना भजन सादर करू दिले जाणार नाही आणि संबंधित पथक स्पर्धेतून बाद ठरविण्यात येईल. याची सर्व पथकांनी दखल घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन कला अकादमीने केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com