गोव्यातील बालभवन शिक्षकांची नोकरी कायम करा

गोव्यातील बालभवन शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन यासंबंधीचे मागणी करणारे पत्र मुख्यमंत्रांना देण्यात आले.
गोव्यातील बालभवन शिक्षकांची नोकरी कायम करा
गोव्यातील बालभवन शिक्षकांची नोकरी कायम करा Dainik Gomantak

पर्ये: गोवा बालभवन केंद्रांतर्गत गोव्याच्या (Goa) प्रादेशिक भागात कार्यरत असलेल्या बालभवन शिक्षकांची (Teachers) नोकरी कायमस्वरूपी करावी आणि गेल्या दोन वर्षांपासून त्यांना होणारी त्यांच्या पगाराच्या (Salary) 5 टक्के वेतनवाढ त्वरित द्यावी अशी बालभवन शिक्षक संघटनेने मागणी केली आहे. यासंबंधी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन यासंबंधीचे मागणी (Demand) करणारे पत्र मुख्यमंत्रांना देण्यात आले.

गोव्यातील बालभवन शिक्षकांची नोकरी कायम करा
कोलवाळ तुरुंगातील कारनामे; आरोपींना विवस्त्रावस्थेत उठाबशा काढण्याची शिक्षा

गोव्यातील प्रादेशिक क्षेत्रात गोवा बालभवनाच्या शाखा आहे. या शाखा मार्फत मुलांना हस्तकला, चित्रकला, नृत्य, रंगकाम, गायन, तबला, हार्मोनियम आदी कला शिकवल्या जातात. या बालभवन केंद्रामध्ये प्रशिक्षक म्हणून असलेले शिक्षक यांची नोकरी कायमस्वरूपी नाही. त्यांची नोकरी कायम नसल्याने त्यांना पगारही तुटपुंजी आहे आणि सरकारच्या इतर कोणत्याही योजनांचा लाभ देखील मिळत नाही. गोव्यात सुमारे यांचे सुमारे 250 शिक्षक आहे. यातील बरेच जण 25 वर्षांपासून काम करतात तर काहीजण फाईन आर्टचे पदवीधर आहे.

दरम्यान, या सर्व शिक्षकांनी 2015 पासून आपली संघटना बनवून त्यामार्फत आपली नोकरी कायमस्वरूपी करावी आणि पणजीतील गोवा बालभवन शिक्षकांना असलेली वेतनश्रेणी लागू करावी अशी मागणी लावून धरली आहे. पण त्यांच्याकडे सरकारने दुर्लक्षित केल्याने त्यांच्यामध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

गोव्यातील बालभवन शिक्षकांची नोकरी कायम करा
नियम पाळा; प्रवास करा; शारजाहातून 160 पर्यटक गोव्यात

गेल्या दोन वर्षांपासून वेतनवाढ नाही

या बालभवन केंद्रामध्ये 1 ते 30 वर्षांपर्यंत काम करणारे शिक्षक आहे. या शिक्षकांना 9260 ते 15240 पर्यंत असा अल्प पगार आहे. 25 वर्षे काम केलेल्या शिक्षकांना केवळ 15 हजारांपर्यंत पगार आहे. हा पगार यांच्यासाठी अल्पसा आहे. दरम्यान दरवर्षी या शिक्षकांना त्यांच्या पगाराच्या 5 टक्के वाढ दिली जाते. पण गेल्या दोन वर्षांपासून ही वाढ त्यांना दिली नाही. मुळात कमीच पगार असताना त्यात ही तुटपुंजी पगारवाढही नसल्याने या शिक्षकांना आपला संसाराचा गाढा हाकताना असंख्य समस्याना सामना करावा लागत आहे. तेव्हा सरकारने यांची ही थकीत पगारवाढ त्वरीत द्यावी अशी मागणी केली आहे.

गोव्यातील बालभवन शिक्षकांची नोकरी कायम करा
गोव्यातील विधानसभा निवडणुका मुदतीपूर्वी घेतल्या जाणार नाही

नवीन संचालकाकडून अपेक्षा

2015 पासून गोव्यातील बालभवन केंद्राच्या शिक्षकांची संघटना स्थापन करून त्यामार्फत त्यांनी आपली मागणी बालभवन अध्यक्षांकडे ठेवली होती. पण त्यांच्या या मागणीवर दुर्लक्ष करून त्यांच्या कोणत्याच मागण्या मान्य केल्या नाही. तसेच त्यांच्या संघटनेतील पदाधिकाऱ्यांना नाहक त्रास करायला सुरुवात केली होती व बऱ्याच जणांच्या बदल्याही करण्यात आल्या होत्या. यातच त्यांना 2020 व 2021 या वर्षांची वेतनवाढ दिली नाही. पण गेल्या महिन्यापासून गोवा बालभवन संस्थेची जबाबदारी आता सरकारने तत्कालीन अध्यक्षांकडून नवीन संचालक मंडळाकडे दिली आहे. ततेव्हा आता या नव्या संचालकाकडून आपल्या समस्या सोडवण्यात येण्याची अपेक्षा या संघटनेने ठेवल्या आहेत. आणि याची मागणी करणारे पत्र त्यांनी सादर केलेले आहे अशी माहिती संघटनेचे सचिव निर्मला उसगावकर यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com