Ayush Healthcare: गोव्यातील दोन्ही आयुष इस्पितळांचे महिनाभरात पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन; मुख्यमंत्र्यांची माहिती

Goa Ayush Hospitals Inauguration: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज मोतिडोंगर-मडगाव येथे नव्याने बांधलेल्या आयुष इस्पितळाला भेट दिली आणि तेथील सुविधांची पाहणी केली.
Goa Ayush Hospitals Inauguration
Ayush HealthcareDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

सासष्टी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज मोतिडोंगर-मडगाव येथे नव्याने बांधलेल्या आयुष इस्पितळाला भेट दिली आणि तेथील सुविधांची पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, आरोग्य खात्याचे संयुक्त सचिव डॉ. प्रणव भट तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी सांगितले, की मोतिडोंगर आणि वेळगे-साखळी येथील आयुष इस्पितळांचे उदघाटन एका महिन्याच्या आत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल. या इस्पितळात आयुर्वेदातील सर्व सेवा उपलब्ध केल्या जातील. तसेच पंचकर्म सुविधासुद्धा येथे दिली जाईल. या दोन्ही इस्पितळांसाठी डॉक्टर व इतर कर्मचारी वर्गाची लवकरच नियुक्ती केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Goa Ayush Hospitals Inauguration
Goa Cricket Association: 50 कोटींच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी जीसीएचा इशारा; आरोप सिद्ध झाल्यास दोषींवर कायदेशीर कारवाई

जिल्हाधिकाऱ्यांना कठोर कारवाईचे आदेश

हल्लीच वकील संघटनेने काही सरकारी अधिकारी म्युटेशनसंदर्भात लाच घेतात, असा आरोप केला होता. यासंदर्भात मडगावात पत्रकारांनी विचारले असता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, की भ्रष्टाचार करणाऱ्या किंवा लाच घेणाऱ्या अधिकारी वा कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही.

जे कोणी अशा बेकायदा प्रकारांमध्ये आढळतात, त्यांना निलंबित केले जाईल किंवा बडतर्फ केले जाईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. भ्रष्टाचार कुठल्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असेही त्यांनी यावेळी निक्षून सांगितले. यासंदर्भात चौकशी करून अशा प्रकरणात गुंतलेल्यांवर कठोर कारवाई करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Goa Ayush Hospitals Inauguration
Goa Agriculture: गोव्यात झेंडू शेतीला बहर! 150 हेक्टरवर लागवड, 200 टन उत्पादनाचा अंदाज

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com