Goa Assembly Winter Session 2026: गोवा सरकारचे हिवाळी अधिवेशन 12 जानेवारीपासून; रामा काणकोणकर हल्ला, हडफडे आग प्रकरण गाजणार

Goa Assembly Winter Session 2026: गोव्याचे राज्यपाल पुसपती अशी गजपती अशोक राजू यांनी १२ ते १६ जानेवारी २०२६ या पाच दिवसांसाठी हिवाळी अधिवेशन बोलवले आहे.
Goa Assembly Winter Session
Goa Assembly Winter Session 2026Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा विधानसभेचे हिवाळी अधिवेशनाची घोषणा झाली आहे. पुढील वर्षी १२ जानेवारीपासून अधिवेशन सुरु होणार आहे. राज्यपाल पुसपती अशोक गजपती राजू यांनी अधिवेशन बोलवले आहे. हिवाळी अधिवेशनाची कालावधी पाच दिवस असणार आहे.

गोवा विधानसभेचे हिवाळी अधिवेशन येत्या १२ जानेवारी २०२६ पासून सुरु होणार आहे. १२ ते १६ जानेवारी या पाच दिवसांसाठी राज्यपाल पुसपती अशोक गजपती राजू यांनी अधिवेशन बोलवले आहे.

पाच दिवसांच्या या अधिवेशनात सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर हल्ला प्रकरण, हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन येथील आगीची घटना हे मुद्दे चांगलेच गाजण्याची शक्यता आहे.

Goa Assembly Winter Session
'पर्रीकरांच्या काळात असं नव्हतं, आत्ताच्या गोवा सरकारमध्ये सगळे हफ्ते मागतायेत'; माजी भाजप मंत्र्याचा गंभीर आरोप, केजरीवालांनी शेअर केला व्हिडिओ

गेल्या तीन महिन्यात राज्यात घडलेल्या विविध घटनांवर विरोध पक्षातील आमदार सरकारला अडचणीत पकडण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर झालेला जीवघेणा राज्याच्या सामाजिक आणि राजकीय पटलावर चांगलाच गाजला.

याप्रकरणात समोर आलेली अनेक नावे आणि आरोपांचे विरोधक या अधिवेशनात भांडवल करतील यात शंका नाही. याशिवाय माझे घर योजनेवरुन देखील सत्ताधाऱ्यांना विरोधक घेरण्याचा प्रयत्न करतील.

Goa Assembly Winter Session
Goa Fishing Boat Missing: सोमवारी निघाले, पण परतलेच नाहीत! काणकोणच्या समुद्रात मासेमारी बोट गायब; 4 मच्छिमारांचा जीव टांगणीला

अलिकडेच बर्च बाय रोमिओ लेन येथे घडलेल्या आगीच्या घटनेत २५ जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी राज्यात बोकाळलेल्या अवैध आणि बेकायदेशीर व्यवसायांचा मुद्दा समोर आला आहे. हायकोर्टाने देखील याप्रकरणाची स्वेच्छा दखल घेतली आहे.

यावरुन विधानसभेत देखील वादळी चर्चा होऊ शकते. दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीत विरोधकांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्याने विधानसभेत विरोधकांची विषयांवर एकी दिसणार का? असा सवालही उपस्थित केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com