Goa Congress Rebel : काँग्रेस आमदारांच्या भाजप विलिनीकरणाला विधानसभा सभापतींची मंजुरी

गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांच्या मंजुरीनंतर दिगंबर कामत, मायकल लोबो यांच्यासह एकूण आठ काँग्रेस आमदारांच्या भाजप प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे.
Congress Rebel MLA meeting with CM Pramod Sawant
Congress Rebel MLA meeting with CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Congress Rebel : काँग्रेसच्या आठ आमदारांच्या गटाने भाजपमध्ये विलिनीकरणाला विधानसभा सभापतींची मंजुरी दिली आहे. गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांच्या मंजुरीनंतर दिगंबर कामत, मायकल लोबो यांच्यासह एकूण आठ काँग्रेस आमदारांच्या भाजप प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. काल बुधवारी या आठ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, मात्र सभापती तवडकर गोव्यात नसल्यामुळे केवळ औपचारिकता शिल्लक होती.

गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाने ‘मिशन लोटस’ ऑपरेशन राबिवण्यास सुरवात केली होती. काँग्रेसच्या 11 पैकी सात आमदारच गळाला लागत असल्याने आठव्या आमदारामुळे हे ऑपरेशन मध्यंतरी रखडले होते. मात्र, भाजपाने पुन्हा आपले जाळे फेकत काँग्रेसला मोठा हादरा दिला आहे. काँग्रेसमध्ये घुसमटलेले आठ आमदार अखेर काल बुधवारी सकाळी भाजपवासी झाले. यावर ‘राहुल गांधी ‘भारत जोडो’ अभियान चालवत असताना राज्यात मात्र ‘काँग्रेस छोडो आंदोलन’ सुरू झाले आहे,’ अशी कोपरखळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मारली आहे.

Congress Rebel MLA meeting with CM Pramod Sawant
Goa Congress Defection : ...म्हणून गोवा विधानसभेत विरोधी पक्षनेताच नसणार

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर 10 जुलै रोजी काँग्रेसच्या सहा आमदारांनी भाजपमध्ये जाण्याची तयारी केली होती. त्यांना आणखी दोन आमदारांची आवश्यकता होती. त्यामुळे सुरू झालेले ‘मिशन लोटस’ यशस्वी होऊ शकले नाही. मात्र, अधिवेशन आणि नंतरच्या काळातही या संभाव्य बंडखोरीची चर्चा सुरूच होती. काँग्रेसचे आमदार फुटणारच होते; मात्र त्यांना दोन आमदार आणि चांगला मुहूर्त मिळत नव्हता. जे अखेर काल बुधवारी साध्य झाले. मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर आणि सांताक्रुझचे आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांनी होकार दिल्यानंतर आज ‘मिशन लोटस’ मार्गी लागले.

काँग्रेसचे 11 पैकी 8 आमदार भाजपवासी झाले. या बंडखोर गटाला आवश्यक असलेला आठ आकडा पूर्ण केला आणि पक्ष विलिनीकरणाचा प्रस्ताव विधिमंडळ गटाच्या बैठकीमध्ये मंजूर करून घेत त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी सविस्तर चर्चा केली. तो प्रस्ताव सभापतींच्या कार्यालयात सादर केला. सभापती रमेश तवडकर दिल्ली दौऱ्यावर होते. घडामोडींची माहिती मिळताच ते तत्काळ गोव्याकडे रवाना झाले. ते येईपर्यंत इतर प्रक्रिया विधिमंडळ सचिव नम्रता उलमन यांनी पूर्ण केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com