Goa Congress Defection : ...म्हणून गोवा विधानसभेत विरोधी पक्षनेताच नसणार

आमदारांच्या बंडानंतर काँग्रेसकडे संख्याबळ नसल्याने यापुढे विरोधी पक्ष नेता नसणार, हे स्पष्ट झालं आहे. यासंदर्भात कायदेशीर बाबींचा अभ्यास केला जाणार असल्याचं सभापती रमेश तवडकर यांनी सांगितलं आहे.
Goa Legislative Assembly
Goa Legislative Assembly Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Politics : गोवा काँग्रेसमधील बंडाळीनंतर 11 पैकी 8 आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र यामुळे गोवा विधानसभेत एक पेच निर्माण झाला आहे. या पक्षांतरामुळे गोव्याच्या विधानसभेत विरोधी पक्षनेताच नसणार, अशी माहिती गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी दिली आहे.

विधानसभेत विरोधी पक्षनेता नसण्यालाही तसंच कारण सभापतींनी सांगितलं आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस गोव्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. त्यामुळे साहजिकच विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे गेलं होतं. मात्र आता आमदारांच्या बंडानंतर काँग्रेसकडे संख्याबळ नसल्याने यापुढे विरोधी पक्ष नेता नसणार, हे स्पष्ट झालं आहे. यासंदर्भात कायदेशीर बाबींचा अभ्यास केला जाणार असल्याचंही सभापतींनी स्पष्ट केलं आहे.

येत्या डिसेंबर महिन्यात गोवा विधानसभेचे अधिवेशन होणार आहे. मात्र काँग्रेस आमदारांच्या भाजप प्रवेशानंतर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत अंतिम निर्णय घेतील, असंही रमेश तवडकर यांनी स्पष्ट केलं.

गोव्यात अगदी सकाळपासूनच सुरु असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. काँग्रेसच्या 8 आमदारांच्या गटाने भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला आहे. गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडेंनी याची औपचारिक घोषणा केली आहे. यासोबतच भाजपच्या पक्ष कार्यालयात आठही आमदारांचं स्वागत करण्यात आलं आहे.

काँग्रेस आमदारांच्या भाजप प्रवेशामुळे गोव्यात भाजपची ताकद आणखी वाढली आहे. दिगंबर कामत यांनी सलग आठवेळा मडगावमधून विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आले आहेत. आता कामत भाजपमध्ये आल्यामुळे काँग्रेसचा बालेकिल्लाही भाजपच्या ताब्यात आला असल्याचं तानावडेंनी जाहीर केलं आहे. त्यामुळे गोव्यात भाजपचं ऑपरेशन लोटस यशस्वी झालं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com