Ramesh Tawadkar: काँग्रेसमधील 8 आमदार फुटून भाजपमध्ये आले, या गोष्टीला आता पाच महिन्यांचा कालावधी उलटला आहे. त्या फुटलेल्या आमदारांना अपात्र ठरविण्यावरून अजूनही कायदेशीर आणि राजकीय लढाई लढली जात आहे.
त्यासाठी काही नेत्यांनी विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांच्याकडे याचिका दाखल केल्या आहेत तर काहींनी थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. (Dissqualification Petition)
पैकी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि डॉमनिक नोरोन्हा यांच्या याचिकेवर सोमवारी सभापती तवडकर यांनी सुनावणी घेतली.
पाटकर आणि नोरोन्हा यांनी आमदार दिगंबर कामत आणि आमदार मायकल लोबो यांनी स्वेच्छेने काँग्रेस पक्ष सोडल्यावरून दोन याचिका दाखल केल्या होत्या. त्यावर विधानसभा सभापती रमेश तवडकर सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता सुनावणी घेतली.
सुनावणीनंतर सभापती तवडकर यांनी काँग्रेसमधून फुटून भाजपमध्ये गेलेल्या आठही आमदारांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी सहा आठवड्यांचा कालावधी दिला. या प्रकरणाची पुढील सुनावणी 5 एप्रिल रोजी होणार आहे.
दरम्यान, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरिश चोडणकर यांनीही या आठ आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशा मागणीची याचिका सभापती तवडकर यांच्याकडे केली होती. पण तवडकर यांनी त्यावर निर्णय घेतला नाही.
त्यामुळे विलंब झाल्याने सभापतींना या याचिकेवर ९० दिवसांत निर्णय घेण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी चोडणकर यांनी न्यायालयात याचिकेद्वारे केली होती. त्यावर सुनावणीवेळी न्यायालायनेही तवडकर यांना या याचिकेवर ९० दिवसांत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.