महाराष्ट्रातील कारागीरांची कलाकुसर; गोव्यात बांबूच्‍या नरकासुरांना मागणी

गोव्‍यात बांबूच्या बेतापासून बनवण्यात येणाऱ्या सांगाड्यांना मोठी मागणी असल्याने सध्या शहरात कारागिरांकडून हे सांगाडे बनवण्यासाठी लगबग सुरू झालेली आहे.
Demand for bamboo narkasur in Goa
Demand for bamboo narkasur in Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: गोव्‍यात दिवाळी म्‍हटली की नरकासुर आलाच. नरकासुररूपी अनिष्ट प्रवृत्तींची राख करुन दीपावली सणाला प्रारंभ केला जातो. हा सण तोंडावर आल्‍याने सध्या डिचोली शहरात विविध ठिकाणी नरकासुराच्या प्रतिमांना आकार देण्याचे काम सुरू झाले आहे. लोखंडी सांगाड्याबरोबरच अलीकडच्या काही वर्षांपासून बांबूपासून बनवण्यात येणाऱ्या नरकासुराच्या सांगाड्यांनाही मोठी मागणी असल्याने जागोजागी हे सांगाडे दिसू लागले आहेत.

गेल्या दहा-बारा वर्षांपासून महाराष्ट्रातील काही कारागिरांनी डिचोली शहरात बांबूच्या बेतापासून सांगाडे बनवण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. दरवर्षी शहरात नरकासुराचे 400 ते 500 सांगाडे तयार होत असतात. बांबूच्या बेतापासून बनवण्यात येणाऱ्या सांगाड्यांना मोठी मागणी असल्याने सध्या शहरात कारागिरांकडून हे सांगाडे बनवण्यासाठी लगबग सुरू झालेली आहे. शहरातील मुस्लिमवाडा परिसरात वास्तव्य करणारे महाराष्ट्रातील तासगाव भागातील कारागीर सध्या बांबूच्या बेतापासून नरकासुराचे सांगाडे तयार करण्याच्या कामाकडे वळले आहेत. या सांगाड्यांना वाढती मागणी असल्याने खपही चांगला होत आहे.

Demand for bamboo narkasur in Goa
गोव्यातील तरुण वर्ग नरकासुर बांधण्यात मग्न
 bamboo narkasur
bamboo narkasurDainik Gomantak

सांगली जिल्ह्यातील तासगाव भागातील डिचोलीत वास्तव्य करून असलेली माने आणि जाधव कुटुंबे या व्यवसायात आहेत. दिवाळीला साधारण महिना असताना ही कुटुंबे नरकासुराचे सांगाडे करण्याच्या कामाला लागतात. या कारागिरांबरोबरच त्यांची बायका-मुलेही त्‍यांना कामात मदत करतात.

Demand for bamboo narkasur in Goa
महागाईचा ‘नरकासुर’ जनतेच्या मानगुटीवर

तयार सांगाड्यांना मागणी चांगली असली तरी कोरोनामुळे गेल्या वर्षी मागणीत घट झाली होती. यंदा कुटुंबीयांच्या मदतीने आपण कमीत कमी २०० सांगाडे करणार आहे. दोन ते दहा फूट उंचीचे सांगाडे तयार करण्याला प्राधान्‍य देतो. आकाराप्रमाणे २०० ते दोन हजार रुपये किमतीपर्यंतचे सांगाडे विक्रीस उपलब्ध असतात. बांबू गोळा करण्यासाठी गावोगाव हिंडावे लागते. जाग्यावर येईपर्यंत यंदा एक बांबू सुमारे दीडशे रुपयांना पडला.

- अशोक माने, कारागीर

गेल्या काही वर्षांपासून आपण डिचोलीत बँजोवादनाचे काम करतो. कोरोनामुळे या व्यवसायाला फटका बसला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपासून आपण बुरूड व्यवसायात उतरलो. गेल्या वर्षी नरकासुराच्या सांगाड्यांना मोठी मागणी नव्हती. कारण तेथेही कोरोनाचा फटका बसला होता. यंदा या सांगाड्यांना मागणी येईल आणि आपल्‍याला चार पैसे मिळतील याच आशेने नरकासुराचे सांगाडे तयार करीत आहे.

- संजय जाधव, कारागीर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com