गोवा मेडीकल हॉस्पिटलचे प्रसिद्ध हदयरोग तज्ञ डॉ. मंजुनाथ देसाई यांचे निधन

बांबोळी इस्पितळात वैद्यकीय सेवा देताना शेकडो रुग्णाना हृदय शस्त्रक्रियेद्वारे डॉ. मंजुनाथ देसाई यांनी जीवदान दिले
GMCH Cardiologist Dr Manjunath Desai pass away
GMCH Cardiologist Dr Manjunath Desai pass away Dainik Gomantak

बांबोळी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळातील प्रसिद्ध हदयरोग तज्ज तथा शल्यविशारद डॉ. मंजुनाथ देसाई यांचे आज रविवारी पहाटे अल्प आजाराने बोरी येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. अनेक रुग्‍णांना डॉ. मंजुनाथ हे एखाद्या देवदूतासारखे भासायचे. त्यांच्या शांत व मृदू स्वभावामुळे ते रुग्णांना आपल्या एखाद्या जवळच्या नातलगासारखे वाटायचे. रोग्यांशी व त्यांच्या नातेवाईकांशी अगदी मोजक्या पण आश्‍वासक शब्दांनी संवाद साधून त्यांना धीर देण्याचा त्यांचा स्वभाव हा वाखाणण्याजोगा होता.

त्यांच्या पश्चात पत्नी एक पुत्र आई भाऊ व इतर परिवार आहे. डॉ. मंजुनाथ देसाई यांनी बांबोळी इस्पितळात वैद्यकीय सेवा देताना शेकडो रुग्णाना हृदय शस्त्रक्रियेद्वारे जीवदान दिले होते. मितभाषी स्वभावाचे डॉ. मंजुनाथ हे गोव्यात सुपरिचीत होते.

कार्य हेच त्याचे स्मारक!

"बोरीत राहत्या घरी त्याचे निधन झाले. आम्ही एका अतिशय कर्तबगार, साध्या सरळ आणि मानवतेच्या उच्च पातळीवर पोचलेल्या हृदयरोगतज्‍ज्ञाला मुकलो. ‌ज्याने केवळ लोकांच्या हृदयावर उपचार केले नव्हते, तर आपल्या वागणुकीने त्यांची मनेही जिंकली होती. आज संपूर्ण गोवा त्याच्यासाठी हळहळतो आहे. त्याच्या ज्ञानाचा अनेक लोकांना फायदा झाला आणि अनेकांचे प्राण वाचले. जे अल्प आयुष्य त्याच्या वाट्याला आले त्याचे त्याने सोने केले. त्याचे जाणे हे अकाली आहे. कदाचित हीच त्या अज्ञात शक्तीची इच्छा असावी, ज्याची कारणमीमांसा करणे आमच्या बुद्धीपलीकडचे आहे. जे आहे ते मात्र धक्कादायक आहे. हे वास्तव सहन करायचे बळ त्याच्या कुटुंबीयांना मिळो. त्याचे कार्य हेच त्याचे स्मारक ठरो आणि त्याचे काम पुढे न्यायची शक्ती त्याच्या सहकाऱ्यांना मिळो, ही प्रार्थना," अशी प्रतिक्रिया डॉ. रेवा दुभाषी यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com