मतदानाची जय्यत तयारी सुरू; अधिकार्‍यांना मतदान यंत्रांचे वाटप

गोवा पोलिस प्रशासन आणि निवडणूक अधिकारी तैनात
Distribution of voting machines
Distribution of voting machinesTwitter/SpokespersonECI

Distribution of Voting Machines: उद्या 14 फेब्रुवारीला गोवा विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडणार आहे. ज्या दिवसाची संपूर्ण गोवेकर आतुरतेने वाट बघत होते त्यासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. उद्याच्या मतदानानंतर गोव्याचे पुढील भवितव्य ठरणार आहे.

या प्रक्रियेसाठी निवडणूक आयोग (Election Commission) सतर्क असून आज गोव्यातील ताळगाव पठारावरील श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर मैदानावर तसेच नावेली येथील पर्रीकर स्टेडियममध्ये मतदान केंद्रांवर कार्यरत असणार्‍या अधिकार्‍यांना मतदान यंत्रांचे आणि साहित्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे. यावेळी गोवा पोलिस प्रशासन (Goa Police) आणि निवडणूक अधिकारी (Election Incharge) तैनात आहेत.

गोव्यातील 40 मतदारसंघांमध्ये आज दिवसभरात 'मतदान बूथ' बसविण्यात येणार आहेत. राज्यात मागील काही महिन्यात झालेल्या राजकारणामुळे संपूर्ण देशाचे लक्ष उद्याच्या मतदानावर केंद्रित झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com