पणजी: शिवसेनेचे (ShivSena) राज्य प्रभारी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना गोव्यात (Goa) 20 जागा लढवणार (Goa Assembly Election) असे जाहीर केल्यानंतर 24 तासांत त्यात 5 जागांची वाढ होऊन शिवसेनेने आता 25 जागा लढवण्याचे ठरवले आहे. संजय राऊत, संपर्क प्रमुख जीवन कामत, गोवा राज्य प्रमुख जितेश कामत आणि राज्य सरचिटणीस मिलिंद गावस यांची मुंबईत अंधेरीच्या मॅरियॉट रेनासन्स हॉटेलमध्ये महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत 45 जागा लढवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
सुमारे दीड तास चाललेल्या या बैठकीत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात काही ठोस निर्णय घेण्यात आले. शिवसेना गोव्यात किमान 25 जागा लढवणार आहे. त्यादृष्टीने कोकण भागातील मंत्री, आमदार आणि पदाधिकारी यांचा प्रचारात सहभाग असणार असून आतापासूनच तयारीला लागावे असे ठरवण्यात आले आहे. विविध नेत्यांच्या गोवा भेटीचा आराखडाही तयार करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राऊत यांनी चर्चा केली असून गोव्यात सर्व ताकदीनिशी लढण्याची तयारी केली आहे. राऊत यांचा अनंतचतुर्दशीनंतर गोवा दौरा होणार असून या दौऱ्यादरम्यान गोव्यातील राजकारणातील काही प्रमुख व्यक्तिंचाही पक्षात प्रवेश होणार आहे.
महाराष्ट्रातील पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या गोवा भेटीवर चर्चा करण्यात आली आहे. त्यांचाही प्रचारात विशेष सहभाग असणार आहे. युतीसंदर्भात चर्चेवेळी तत्वतः ‘एकला चलो’वर शिक्कामोर्तब केले आहे. बाकी पक्षांच्या नेत्यांबरोबर राऊत यांची बोलणी सुरू असून युती झाल्यास 16 जागांवर शिवसेनेने कोणत्याही स्थितीत तडजोड न करण्याचे ठरवले आहे, अशी माहिती कामत यांनी दिली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.