गोव्यातील म्हादई, दूधसागर नदीवर येणार 10 नवे प्रकल्प

या दहा प्रकल्पांसाठी सर्व्हेक्षणाचे काम प्रगतिपथावर सुरू
Dam
DamDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यातील (Goa) म्हादई नदीवरून (Mandovi River) नेहमीच वाद पेटत असतो. गोवा कर्नाटक (Karnataka) या राज्यांचे म्हादईच्या पाण्यावरून नेहमीच खटके उडत असतात. मात्र आता म्हादई आणि दूधसागर नद्यांवर दहा लघु धरणे बांधण्यात येणार आहे. या धरणाचे पहिल्या टप्प्यात काम हाती घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

मात्र चरावणे धरणाचे काम पुर्ण न होताच बंद पडल्यामुळे, तसेच पर्यावरण मंत्रालयाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे यापुढे रीतसर परवाने घेऊनच काम सुरू करण्याचा प्रयत्न जलस्रोत खाते करत आहे. विशेष बाब म्हणजे सध्या या दहा प्रकल्पांसाठी सर्व्हेक्षणाचे काम प्रगतिपथावर सुरू आहे.

Dam
Goa Curfew: केरळमधून गोव्यात येणाऱ्यांना विलगीकरण सक्तीचे

सत्तरी आणि डिचोली तालुक्यांत म्हादई नदीवर पाच तर उर्वरित पाच प्रकल्प धारबांदोडा आणि फोंडा तालुक्यांतील दूधसागर नदीवर येणार आहेत. 1999च्या मास्टर प्लाननुसार 59 पैकी 10 लघु धरणांचे काम सध्या हाती घेण्याच्या दृष्टीने जलस्रोत खात्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. 2021-22च्या अर्थसंकल्पात या प्रकल्पांसाठी 50 कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे.

सत्तरी तालुक्यात गोळाली-ठाणे, झर्मे आणि रीवे या गावांमधील कोत्राची नदी या म्हादईच्या उपनदीवर तीन प्रकल्प येणार आहे. तर केरी सत्तरी येथे कयटी या म्हादईच्या उपनदीवरसुद्धा एक लघु जलप्रकल्प येणार आहे. धारबांदोडा तालुक्यात काजूमळ-मोले, सुकतळी-मोले आणि तातोडी-कुळे या गावात दूधसागर नदीवर तीन प्रकल्प येणार आहे.

Dam
Goa Monsoon Updates: सत्तरी, साखळी, वाळपई, सांगेत पावसाची संततधार

दरम्यान फोंडा तालुक्यात निरंकाल-बेतोडा आणि कोडार येथेही दूधसागर नदीवरच प्रकल्प उभारण्याचा विचार जलस्रोत खाते करत आहे. त्याचबरोबर डिचोली तालुक्यात अडवलपाल येथे अस्नोडा नदी या म्हादईच्या उपनदीवर देखील लघु जलप्रकल्प येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com