गोव्याला लवकरच मिळणार तिसरा जिल्हा? सरकार सकारात्मक; CM सावंतांचे मोठे भाष्य

Third District In Goa: गोव्यात गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा एकदा तिसऱ्या जिल्ह्याची मागणी जोर धरु लागली आहे.
Verna IDC: सिप्ला कंपनीतील अपघाताचा मुद्दा विधानसभेत, मुख्यमंत्र्यांनी दिले सखोल चौकशीचे आदेश
CM Dr. Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यात गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा एकदा तिसऱ्या जिल्ह्याची मागणी जोर धरु लागली आहे. सरकारने हीच मागणी लक्षात घेऊन काही दिवसांपूर्वी अभ्यास करण्यासाठी समितीही स्थापन केली होती.

राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 6 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. याच पाश्वभूमीवर आता खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तिसऱ्या जिल्ह्याच्या मागणीवर सकारत्मकता दाखवली आहे.

विशेष म्हणजे, त्यांनी नियोजन आणि सांख्यिक संचालनायाला यासंबंधी निर्देशही दिले. आज (2 ऑगस्ट) सभागृहात बोलताना मुख्यमंत्र्यांनी या मागणीवर सरकारचा हेतू स्पष्ट केला.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, ''राज्यात तिसऱ्या जिल्ह्याच्या निर्मितीसाठी सरकार सकारात्मक आहे. नियोजन आणि सांख्यिक संचालनालयाला संबंधित निर्देशही देण्यात आलेत. केपे, काणकोण (Canacona), सावर्डेसारख्या तालुक्यांमध्ये सरकारच्या सेवा पोहोचवण्यासाठी तिसरा जिल्हा महत्वाचा ठरेल.''

Verna IDC: सिप्ला कंपनीतील अपघाताचा मुद्दा विधानसभेत, मुख्यमंत्र्यांनी दिले सखोल चौकशीचे आदेश
Goa Third District: सभापती रमेश तवडकरही म्हणतात, 'गोव्यात तिसरा जिल्हा व्हावा', कारणही स्पष्ट केले

दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दोन वर्षापूर्वी राज्यात तिसऱ्या जिल्हा निर्मितीचे संकेत दिले होते. धारबांदोडा तालुक्याच्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री बोलत होते.

धारबांदोड्यासह राज्यात तिसरा जिल्हा निर्माण केला जाईल. राज्याची लोकसंख्या वाढत आहे आणि त्या सुविधा सर्व लोकांच्या आवाक्यात असणे आवश्यक आहे, असे सावंत यांनी म्हटले होते.

Verna IDC: सिप्ला कंपनीतील अपघाताचा मुद्दा विधानसभेत, मुख्यमंत्र्यांनी दिले सखोल चौकशीचे आदेश
Third Airport In Goa: गोव्यात तिसरे विमानतळ? दाबोळीच्या वादात दोन मंत्र्यांनी केले मोठे वक्तव्य

काणकोण, केपे, सांगे आणि धारबांदोडा हे तालुके मिळून तिसरा जिल्हा व्हावा अशी आमची देखील मागणी आहे. हा आदिवासी भाग आहे. तिसरा जिल्हा झाल्यास त्याचा विकास होण्यास मदत होईल, असे मत सभापती तवडकर यांनी व्यक्त केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com