Goa Third District: सभापती रमेश तवडकरही म्हणतात, 'गोव्यात तिसरा जिल्हा व्हावा', कारणही स्पष्ट केले

Goa Speaker Bats For Third District: काणकोण, केपे, सांगे आणि धारबांदोडा हे तालुके मिळून तिसरा जिल्हा व्हावा अशी आमची देखील मागणी आहे.
Goa Third District: सभापती रमेश तवडकरही म्हणतात, 'गोव्यात तिसरा जिल्हा व्हावा', कारणही स्पष्ट केले
Goa Assembly Session 2024| Speaker Ramesh TawadkarDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यात तिसरा जिल्हा व्हावा ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. यासाठी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान कृषिमंत्री रवी नाईक आग्रही आहेत. भाजपमध्ये येण्याचे कारण देखील ते तिसऱ्या जिल्ह्याची मागणी हेच असल्याचे सांगतात. आता सभापती रमेश तवडकर यांनी देखील तिसऱ्या जिल्ह्याच्या मागणीचे समर्थन केले आहे.

पावसाळी अधिवेशनासाठी सभागृहात दाखल होत असताना सभापती तवडकारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जिल्ह्याच्या मागणीचे समर्थन केले.

राज्यात तिसऱ्या जिल्ह्याची मागणी होत आहे. काणकोण, केपे, सांगे आणि धारबांदोडा हे तालुके मिळून तिसरा जिल्हा व्हावा अशी आमची देखील मागणी आहे. हा आदिवासी भाग आहे. तिसरा जिल्हा झाल्यास त्याचा विकास होण्यास मदत होईल, असे मत सभापती तवडकर यांनी व्यक्त केले.

Goa Third District: सभापती रमेश तवडकरही म्हणतात, 'गोव्यात तिसरा जिल्हा व्हावा', कारणही स्पष्ट केले
Goa Crime: लैंगिक अत्याचार प्रकरणातील पीडितेला २ लाख आर्थिक मदत; पोक्सो न्यायालयाचा आदेश

मंगळवारी सभागृहात महसूल खात्यासंबधित मागण्या आणि कपात सूचना सत्रात बोलताना आमदार विजय सरदेसाईंनी तिसऱ्या जिल्ह्याच्या मागणीवरुन रवी नाईकांना डिवचण्याचा प्रयत्न केला. रवी नाईक तिसऱ्या जिह्याची मागणी घेऊनच भाजपमध्ये गेले होते. नाईक आता मंत्री होऊन त्यांचे मंत्रिपद जाण्याची वेळ आली तरी तिसरा जिल्हा काही झाला नाही, असे सरदेसाई सभागृहात म्हणाले.

दरम्यान, आता खुद्द सभापतींने देखील तिसऱ्या जिल्ह्याचे समर्थन केल्याने आता सरकार खरच या मागणीचा गांभीर्याने विचार करणार का? याबाबत गोमंतकीयांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com