Goa Apprenticeship Scheme: काणकोणातील तरुण-तरुणींना ‘ॲप्रेंटिसशीप’खाली नियुक्तीपत्रांचे वितरण

सभापती : बेरोजगारांची स्थिती सुधारण्याचा हेतू
Mla Ramesh Tawadkar
Mla Ramesh TawadkarDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Apprenticeship Scheme : पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देशभरातील बेरोजगारी मिटवण्यासाठी प्रयत्नरत आहेत. त्याच धर्तीवर मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत गोवा समृद्ध करण्याकरता रोजगार उपलब्ध करण्याकरता शिकाऊ शिक्षण योजनेअंतर्गत युवक-युवतींना सामावून घेऊन १-२ वर्षांत उत्कृष्ट कर्मचारी उपलब्ध करण्याच्या दिशेने कार्यरत आहेत.

माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी नोकरीपूर्व प्रशिक्षण योजनेसंदर्भात काहींना रोजगार मिळवून दिला होता. तशीच ही योजना असून बेरोजगारांची स्थिती सुधारावी, अशी यामागची भूमिका आहे, असे प्रतिपादन सभापती व स्थानिक आमदार रमेश तवडकर यांनी केले.

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त शनिवार, 15 रोजी शेळेर-काणकोण येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात ॲप्रेंटिसशीप योजनेखाली नोंदणी केलेल्या तरुण-तरुणींना सरकारी कार्यालये आणि खासगी कंपन्यांत प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्तीपत्रांचे वितरण कार्यक्रमात सभापती तवडकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

Mla Ramesh Tawadkar
Goa Governor : राजभवनमध्ये रंगला कुटुंब मेळावा; अनेकांचा गाैरव

यावेळी व्यासपीठावर तवडकरांसह निमंत्रित पाहुणे उपजिल्हाधिकारी रमेश गावकर, औद्योगिक प्रशिक्षण संस्था काणकोणचे गट प्रशिक्षक गजानन नाईक, चंद्रकांत सुधीर, पूनम गावकर, सुनील पैंगीणकर, काणकोण नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष नादिन फर्नांडिस, सरपंच आनंदु देसाई, प्राचार्य गौतमी भगत, प्रोव्हेदोरिया संचालक विनायक वळवईकर,

सरपंच प्रतिजा बांदेकर, सरपंच प्रीतल फर्नांडिस, उपसरपंच सुनील पैंगीणकर, नगरसेवक हेमंत नाईक गावकर, धीरज नाईक गावकर, सारा देसाई, अमिता पागी, नार्सिस्को फर्नांडिस व अन्य उपस्थित होते.

त्यानंतर उपस्थितांनी मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांचे आभासी भाषण ऐकले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डिकॉस्टा यांनी केले.

Mla Ramesh Tawadkar
Goa Hit and Run Case : तुटलेल्या नंबरप्लेटच्या साहाय्याने संशयिताच्या आवळल्या मुसक्या

नोकरीच्या संधींचे निर्माण

‘कौशल्य भारत, कुशल भारत’ या योजनेअंतर्गत युवावर्गाच्या सुरक्षित भविष्यासाठी राज्य सरकारने ॲप्रेंटिसशीप योजनेखाली (शिकाऊ शिक्षण) सरकारी कार्यालये व खासगी क्षेत्रात १० हजारांवर नोकरीच्या संधी तयार केल्या आहेत. आतापर्यंत पोर्टलवर साडेआठ हजारांपेक्षा जास्त जणांनी नोंदणी केली आहे.

काहीजण कामावर रुजू

काणकोण भागात ३८ युवक-युवतींना ॲप्रेंटिसशीप योजनेअंतर्गत नियुक्तीपत्रे सभापती रमेश तवडकर यांच्या हस्ते वितरित करण्यात आली. शिवाय काही युवक शुक्रवार, १४ रोजी नियुक्तीच्या ठिकाणी कामावर रुजू झालेले आहेत.

Mla Ramesh Tawadkar
Goa Apprenticeship Scheme : खासगी संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांना मिळणार जादा 1,500 रुपये स्टायपेंड : मुख्यमंत्री

प्रदूषणविरहित प्रकल्पाकरता मुख्यमंत्री व अन्य संबंधितांशी प्राथमिक स्तरावरील बोलणी झालेली आहेत. पुढील ६ महिन्यांत निश्चितपणे चांगली बातमी मिळेल. या योजनेच्या निमित्ताने जर १० हजार तरुणांना रोजगार देऊ शकलो तर उद्देश सफल होईल. यामुळे बेकार असलेला तरुण वर्ग वाईट मार्गाला लागण्यापासून वाचेल. ही योजना ११ रोजी संपलेली असली तरी यापुढेही सुरू रहाणार आहे.

रमेश तवडकर, सभापती

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com