Goa Governor : राजभवनमध्ये रंगला कुटुंब मेळावा; अनेकांचा गाैरव

पारंपरिक कारागिरांसाठी योजना जाहीर
Goa Governor
Goa GovernorDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Governor : राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांना दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राजभवन येथील न्यू दरबार सभागृहात आज आयोजित करण्यात आलेल्या कुटंब मेळाव्यात गोव्यातील लोकांच्या पारंपरिक कौशल्ये, व्यवसायांना पाठिंबा आणि प्रोत्साहन देण्यासाठी एक योजना जाहीर केली.

त्यात पारंपरिक कौशल्ये, व्यवसाय याअंतर्गत कुंभार (माती काम), कुणबी साडी आणि काष्टी (हातमाग), कॉयर मेकिंग, गोधडी बनविणे (पारंपरिक पॅचवर्क रजई), बांबू काम, फुलकार (फ्लॉवर क्राफ्ट), लऊ मांद्री (चटई विणकाम), चितारी (चित्र/चित्रकला) आदी कारागिरांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी कुटुंब मेळावा सोहळ्याला उपस्थिती लावली. १५ जुलै हा गोव्यासाठी महत्त्वाचा दिवस आहे. कारण या दिवशी वसाहतवादी राजवटीविरुद्ध युद्ध सुरू झाले होते, असे सांगितले.

Goa Governor
Goa Congress : सरकारकडून गैरवापर झालेली पीडीए बरखास्त करा ; काँग्रेस

सुरवातीस राज्यपालांचे सचिव एम. आर. एम. राव, आयएएस यांनी प्रास्ताविक केले आणि पाहुण्यांचे स्वागत केले. त्यांनी राजभवनात हाती घेतलेल्या विविध उपक्रमांवर प्रकाश टाकला. यावेळी मनोहर भिंगी यांचा थेट सादरीकरणासाठी राज्यपालांनी गौरव केला.

मुलांच्या कलागुणांचे कौतुक

यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्यात प्रतिभावंत कलाकारांनी विविध प्रकारच्या कला सादर केल्या.

त्यात सान्वी गुरव - नृत्य, आदित्य दास आणि धृती कंडोलकर - जिम्नॅस्टिक, निमिष बोरकर - गितार, ऐशानी राव आणि ऐशानी गडकरी यांचा समावेश होता. या सर्वांचा श्रीमती के. रिटा यांच्या हस्ते कौतुकास्पद पुरस्कार प्रदान करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com