Port Workers Protest: बंदर कामगारांच्‍या वेतनप्रश्‍‍नी इंडियन पोर्ट असोसिएशनचे वेळकाढू धोरण; गोव्यासह देशभरात आज निदर्शने

Port Workers Protest Against Indian Port Association: बंदर कामगारांच्या वेतन समझोत्यासंबंधी इंडियन पोर्ट असोसिएशनने वेळकाढू धोरण स्विकारल्याच्या निषेधार्थ गुरुवारी (ता.५) देशभरात दुपारी जेवणाच्या वेळेत निदर्शने करण्यात येणार आहे.
Port Workers Protest: बंदर कामगारांच्‍या वेतनप्रश्‍‍नी इंडियन पोर्ट असोसिएशनचे वेळकाढू धोरण; गोव्यासह देशभरात आज निदर्शने
Port Workers ProtestDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: बंदर कामगारांच्या वेतन समझोत्यासंबंधी इंडियन पोर्ट असोसिएशनने वेळकाढू धोरण स्विकारल्याच्या निषेधार्थ गुरुवारी (ता.५) देशभरात दुपारी जेवणाच्या वेळेत निदर्शने करण्यात येणार आहे.

सडा येथील मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या प्रशासकीय कार्यालयाच्या इमारतीसमोर मुरगाव बंदर व गोदी कामगार संघटना आणि गोवा बंदर व रेल्वे कामगार संघटना या दोन मान्यताप्राप्त संघटनातर्फे निदर्शने करण्यात येणार आहे. दरम्यान बंदर कामगारांच्या वेतन समझोत्यासंबंधी १५ डिसेंबरला किंवा तत्पूर्वी अंमलबजावणी न झाल्यास सर्व प्रमुख बंदरांतील कामगार १७ डिसेंबरनंतर अनिश्र्चित काळासाठी औद्योगिक संपाचा अवलंब करतील, असा इशारा देण्यात आला आहे.

इंडियन पोर्ट्स असोसिएशनने देशातील सर्व प्रमुख बंदर प्राधिकरणांना वेतन समझोत्यासंबंधी माहिती देण्याची गरज होती.तथापी दोन महिने उलटून गेल्यावरही भारतीय बंदर संघटनेने सदर समझोत्यासंबंधी प्रमुख बंदर प्राधिकरणांना माहिती न दिल्याबदद्लल सदर वृत्तीविरोधी आवाज उठविण्याचा निर्णय प्रमुख बंदरे कामगार महासंघांच्या राष्ट्रीय समन्वयक समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता.

Port Workers Protest: बंदर कामगारांच्‍या वेतनप्रश्‍‍नी इंडियन पोर्ट असोसिएशनचे वेळकाढू धोरण; गोव्यासह देशभरात आज निदर्शने
Pilgao Mining Protest: पिळगावचे वातावरण तापले; आंदोलनात महिलांची उडी, तिसऱ्या खनिज वाहतूक बंदच

देशातील बंदर कामगारांच्या सहा महासंघांच्या राष्ट्रीय समन्वयक समितीची बैठक २३ व २४ नोव्हेंबरला गोव्यात (Goa) झाली. त्यावेळी सदर वेतन समोझोत्यासंबंधी चर्चा करण्यात आली. देशातील प्रमुख बंदर प्राधिकरणे व बंदर आणि गोदी कामगारांच्या मान्यताप्राप्त महासंघ यांच्या वेतन संरचनेत सुधारणा व पेन्शनरी लाभांसह इतर सेवाशर्तीबाबत समझोता करार २७ सष्टेंबरला करण्यात आला होता. यासंबंधी भारतीय बंदर संघटनेने सर्व बंदर प्राधिकरणाला माहिती देण्याची गरज होती. परंतु भारतीय बंदर संघटनेच्या उदासीन वृत्तीमुळे ती संबंधितांना देण्यात आली नसल्याचा दावा करण्यात आला. सदर समझोता करारची माहिती देण्यात न आल्याबद्दल भारतीय बंदर संघटनेच्या सुस्त कारभाराविरोधात कामगारांना एकत्र आणण्याचा निर्णय घेण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com