Anmod Ghat Road:- अनमोड घाट मार्ग दिनांक 5 ते 25 जानेवारीपर्यंत अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आलाय. रेल्वे विभागाच्या डबलिंग कामासाठी मार्ग बंद असेल असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढलाय.
लघु वाहनांना जाण्यासाठी रामनगर ,तिनेघाट, मार्संगाळ तर येण्यासाठी अनमोड, कॅसरलॉक, चांदेवाडी जगलबेट मार्ग देण्यात आला आहे. अवजड वाहनांना अळणावर- हल्ल्याळ -यलापूर मार्ग देण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे.
ट्राफिक जामची समस्या:-
अनमोड घाट हा बेळगांव आणि गोव्याला जोडणारा महत्वाचा घाटमार्ग असून दररोज हजारो वाहन या मार्गाने ये- जा करीत असतात. मागील आठवडाभरापूर्वी एका ट्रॉलीमुळे घाटात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
तसेच काही महिन्यांपूर्वी अनमोड ते रामनगरपर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु असल्यानेही वाहनचालकांना कसरत करावी होती.
प्रवेश शुल्क:-
गोव्यातून कर्नाटकमध्ये जाणाऱ्या वाहनांना अनमोड तपासणी नाक्यावर प्रवेश शुल्क भरावे लागत असून कर्नाटक वन खात्याने व्याघ्र प्रकल्प आणि राष्ट्रीय वन्यजीव उद्यानातून जाणाऱ्या वाहनांकडून प्रवेश शुल्क आकारणी सुरू केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.